You are currently viewing राष्टनिर्माणाचं अटलजींच्या स्वप्नांचा आपण विचार करणे ही आजच्या पिढीची प्राथमिकता असली पाहिजे… सौ. उमा प्रभू

राष्टनिर्माणाचं अटलजींच्या स्वप्नांचा आपण विचार करणे ही आजच्या पिढीची प्राथमिकता असली पाहिजे… सौ. उमा प्रभू

सावंतवाडी

देशाला नव्हे तर साऱ्या जगाला मानव जातीच्या कल्याणासाठीच झटणाची प्रेरणा देणाऱ्या अटलजीनी राष्ट्र निर्माणासाठीच आपलं सारं आयुष्य वेचल.राष्ट्रवादा बरोबरच आपण सारे भारतीय एक आहोत ही विचारधारा त्यांच्या कृतीतून अवघ्या भारत वर्षाला अनुभवायला मिळाली. अशा हिमालया एवढ कर्तुत्व असणाऱ्या अटलजींच्या नांवाने न्यासाची स्थापना करुन अॅड. नकुल पार्सेकर सातत्याने गेली १९ वर्षे या जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत आहेत याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. ज्याना अटल गौरव पुरस्काराने सन्मानित केले त्यांना या पुढच्या काळातही आणखीन समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळेल. अशाही शुभेच्छा त्यांनी दिल्या. अटल प्रतिष्ठानच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.


यावेळी डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. अमेय देसाई, श्री माऊली दारवटकर, ऋषी देसाई, सौ. उषा परब, शिवप्रसाद देसाई, राजेंद्र केसरकर, उमेश गाळवणकर,साईनाथ जळवी,उदय आईर अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा जणांना अटल गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच राष्ट्रसाधना या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
विशेष अतिथी म्हणून उपस्थित असणाऱ्या डिपार्टमेंट आॅफ अॅटोमिक एनर्जी भारत सरकारच्या सयुक्त सचिव मा. सौ सुषमा तायशेटे यांनी अटल प्रतिष्ठानच्या या जिल्ह्यातील वाटचाल ही समाजाला दिशा देणारी असून समाजात समर्पित भावनेने काम करणाऱ्या या दहा दिपस्तभांचा अटल गौरव पुरस्काराने केलेला सन्मान आणि डोळसपणे अशा माणसांची केलेली पारख याबद्दल अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. नकुल पार्सेकर हे सुद्धा कौतुकास पाञ आहेत.


सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे यांनी भविष्यात अटल प्रतिष्ठान व सावंतवाडी संस्थान समाजाभिमुख अनेक कार्यक्रम राबवणार असल्याचे सांगितले.
सत्कार मुर्तीच्या वतीने डॉ. अमेय देसाई,माउली दारवटकर व ऋषी देसाई यांनी कृतज्ञता व्यक्त करून अटलजींच्या नावाने मिळालेल्या या सत्कारामुळे नवीन उर्जा प्राप्त झाल्याचे सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात स्नेहालय अहमदनगरचे अध्यक्ष व सत्कारमुर्ती डॉ गिरीश कुलकर्णी यांनी अटलजींची संघर्षमय राजकीय कारकीर्दचा सविस्तर आढावा घेतला.
कार्यक्रम सौ. शुभदादेवी भोसले, सौ. श्रद्धाराजे भोसले तसेच सिंधुदुर्ग, गोवा पुणे, रत्नागिरी, मुंबई, नाशिक, पिंपरी चिंचवड या भागातील विविध क्षेत्रात काम अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी वयम् डान्स स्टुडिओ पुणे च्या संचालिका स्नेहल पार्सेकर आणि सहकाऱ्यांनी भरतनाट्यम अविष्कार सादर केला तसेच अटल प्रतिष्ठानच्या बालचमूचाही लक्षवेधी कार्यक्रम सादर झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. नकुल पार्सेकर यांनी केले. सुञसंचालन सौ. सुष्मिता चव्हाण व कु. प्रिया पार्सेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. राजशेखर कार्लेकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − eight =