मुंबई
दिव्यांग व्यक्तींमध्ये समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती व जनजागृती करण्याच्या हेतूने दिव्यांग कल्याण आयूक्तालय, पुणे, यांच्या मार्फत मोफत वेबीनार आयोजित करण्यात येत आहे.
त्यानुसार 23 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 11.30 वाजता समाज कल्याण विभागाच्या विविध योजना व दिव्यांग व्यक्ती याबाबत अधिक माहिती देण्याकरिता शरद चव्हाण, उपायुक्त- नागरी हक्क संरक्षण, सुरेंद्र पवार,उपायुक्त- जात प्रमाणपत्र पडताळणी, विजय गायकवाड, सहाय्यक आयुक्त – शासकीय वसतिगृह व अनुदानित वसतिगृह, योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त – रमाई आवास योजना यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/qdXf2wNzxQg या लिंकचा वापर करावा.
दुपारी 3.00 वाजता समाज कल्याण विभागाच्या विविध योजना व दिव्यांग व्यक्ती याबाबत अधिक माहिती देण्याकरिता बी जी अरावत सहाय्यक आयुक्त – मिनी ट्रॅक्टर व दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजना राधकीसन देवडे सहाय्यक आयुक्त- जिल्हा परिषद सेस फंड उमेश शहागडकर समाज कल्याण निरीक्षक – भारत सरकार शिष्यवृत्ती परदेश व परराज्य शिष्यवृत्ती यांना आमंत्रित करण्यात आले आहे. सदरच्या मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/jHRC1uh0p2M या लिंकचा वापर करावा.
तसेच यापूर्वी दिव्यांग कल्याण आयूक्तालय, पुणे, यांच्यामार्फत आत्तापर्यंत घेण्यात आलेल्या वेबीनारचा लाभ घेण्याकरिता दिव्यांग कल्याण आयूक्तालय, पुणे, यांच्या यु टयूब चॅनलला भेट द्यावी.