You are currently viewing प्रमोद करलकर यांना ‘राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत’ पुरस्कार जाहीर

प्रमोद करलकर यांना ‘राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत’ पुरस्कार जाहीर

मालवण

मालवण मधील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद किसन करलकर यांना समर्थ सोशल फाउंडेशन या संस्थेचा ‘राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराबद्दल प्रमोद करलकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

समर्थ सोशल फाऊंडेशन व न्युट्रीफील हेल्थ प्रो.प्रा.लि. अंतर्गत सुरु असणाऱ्या व्यसनमुक्त व मधुमेहमुक्त भारत अभियानामध्ये मालवण देउलवाडा आडवण येथील प्रमोद करलकर यांनी समाजातील व्यसनी व मधुमेह असणाऱ्या लोकांना व त्यांचा कुटुंबाला या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मदत केली व त्या कुटुंबाला नवसंजीवनी दिली. संस्थेच्या या व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती कार्यामध्ये भाग घेऊन प्रमोद करलकर यांनी सामाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे, असे संस्थेने म्हणतं त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार दि. २५ जून रोजी कोल्हापूर येथे होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + six =