You are currently viewing कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतराचा निर्णय उद्या होणार

कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतराचा निर्णय उद्या होणार

पालकमंत्री उदय सामंत यांनी मराठा समाज कार्यकर्त्यांशी साधला संवाद

कणकवली

कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतर मुद्द्यावर पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे थांबत मराठा समाज कार्यकर्त्यांशी थेट साधणार संवाद साधला. कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रात्री 8 वाजता पालकमंत्री उदय सामंत यांचे आगमन झाले .यावेळी मराठा समाज कार्यकर्त्यां बरोबरच अन्य शिवप्रेमी उपस्थित होते. यावेळी मराठा समाज कार्यकर्त्यांनी महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोणत्या स्थितीत स्थलांतरित झालाच पाहिजे अशी मागणी लावून धरली असता पालकमंत्र्यांनी उद्याच्या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत पुतळा स्थलांतरावर निर्णय होईल.

त्याचबरोबर या शिवाजी महाराज स्मारकासाठी जिल्हा नियोजनमध्ये 1 कोटीचा निधी मंजूर केला जाईल, असा विश्वास मराठा समाज कार्यकर्त्यांना पालकमंत्र्यांनी दिला. यावेळी सकल मराठा समाजाचे भाई परब,बबलू सावंत ,सुशील सावंत, बच्चू प्रभुगावकर,महेश सावंत, एस.एल.सपकाळ,महेश सांब्रेकर,हर्षद गावडे,नगरसेवक सुशांत नाईक, सुशांत दळवी, राजू राठोड,शेखर राणे,भास्कर राणे,बाळू मेस्त्री यांच्यासह सकल मराठा समाज कार्यकर्ते उपस्थित होते. पालकमंत्री उदय सामंत यांची यांच्यासोबत मराठा समाजाचे कार्यकर्ते यांनी मांडलेले मुद्दे ऐकून घेतले.त्यावर सकारात्मक चर्चा करत उद्याच्या बैठकीत फायनल निर्णय घेऊ, तुम्ही सर्व जण उद्याच्या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. .

प्रतिक्रिया व्यक्त करा