दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत मोफत वेबिनार….

दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत मोफत वेबिनार….

मुंबई

दिव्यांग व्यक्तींमध्ये  समाज कल्याण विभागाच्या योजनांची  माहिती व जनजागृती करण्याच्या हेतूने दिव्यांग कल्याण आयूक्तालयपुणेयांच्या मार्फत मोफत वेबीनार आयोजित करण्यात येत आहे.

            त्यानुसार 23 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 11.30 वाजता समाज कल्याण विभागाच्या विविध योजना व दिव्यांग व्यक्ती याबाबत अधिक माहिती देण्याकरिता शरद चव्हाणउपायुक्त- नागरी हक्क संरक्षणसुरेंद्र पवार,उपायुक्त- जात प्रमाणपत्र पडताळणीविजय गायकवाडसहाय्यक आयुक्त – शासकीय वसतिगृह व अनुदानित वसतिगृहयोगेश पाटीलसहाय्यक आयुक्त – रमाई आवास योजना यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/qdXf2wNzxQg  या लिंकचा वापर करावा.

            दुपारी 3.00 वाजता समाज कल्याण विभागाच्या विविध योजना व दिव्यांग व्यक्ती याबाबत अधिक माहिती  देण्याकरिता बी जी अरावत सहाय्यक आयुक्त – मिनी ट्रॅक्टर व दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजना राधकीसन देवडे सहाय्यक आयुक्त- जिल्हा परिषद सेस फंड उमेश शहागडकर समाज कल्याण निरीक्षक – भारत सरकार शिष्यवृत्ती परदेश व परराज्य शिष्यवृत्ती      यांना आमंत्रित करण्यात आले आहे. सदरच्या मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/jHRC1uh0p2M या लिंकचा वापर करावा.

            तसेच यापूर्वी दिव्यांग कल्याण आयूक्तालयपुणेयांच्यामार्फत आत्तापर्यंत घेण्यात आलेल्या वेबीनारचा लाभ घेण्याकरिता दिव्यांग कल्याण आयूक्तालयपुणेयांच्या यु टयूब चॅनलला भेट द्यावी.  

प्रतिक्रिया व्यक्त करा