You are currently viewing सरमळे शितपवाडीत घरोघरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा

सरमळे शितपवाडीत घरोघरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष संदीप जंगले यांचा स्तुत्य उपक्रम

ओटवणे
ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या विद्यार्थी आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष संदीप जंगले यांनी सरमळे गावात अतिदुर्गम स्थानी असलेल्या धनगर समाजाच्या शितपवाडीत घरोघरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे स्वखर्चाने वितरण केले. या स्तुत्य उपक्रमाचे सरमळे परिसरातून कौतुक होत आहे.
धनगर समाज बांधवाचे प्रेरणास्थान असेलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या योगदानाची समाज बांधवांना माहिती होण्याच्या उद्देशाने सरमळे गावचे सुपुत्र संदीप जंगले यांनी स्वखर्चाने शितपवाडीत घरोघरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे वितरण केले. धनगर समाजाची अस्मिता जोपासणाऱ्या संदीप जंगले यांच्या या अभिनव व प्रबोधनात्मक उपक्रमाचे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यानीही कौतुक केले

प्रतिक्रिया व्यक्त करा