You are currently viewing कनकसंध्या कार्यक्रमातून कोकणच्या संस्कृतीचे दर्शन

कनकसंध्या कार्यक्रमातून कोकणच्या संस्कृतीचे दर्शन

200 हून  अधिक कलावंतांचा अविष्कार सादर

कणकवली

कणकवली पर्यटन महोत्सवाचा दुसरा दिवस कणकवलीकरांनी गाजवला. दोनशेहून अधिक कलावंतांचा सहभाग असलेल्या ‘कनकसंध्या’ या कार्यक्रमातून कोकणच्या संस्कृतीचे दर्शन घडले. गायन, वादन, नृत्य यांचा अनोखा मिलाफ असलेला हा कार्यक्रम रसिकांसाठी पर्वणीच ठरला. रंगकर्मी सुहास वरुणकर, प्रा. हरिभाऊ भिसे आणि संजय मालंडकर यांनी निर्मिती केलेला हा कार्यक्रम पाहण्यासाठी रसिकांनीही मोठी गर्दी केली होती.


कणकवली पर्यटन महोत्सवात दुसर्‍या दिवसाचा प्रारंभ ‘कनकसंध्या’ कार्यक्रमाने झाला. यात सिंधुगर्जना ढोलपथकाच्या साथीने दोनशेहून अधिक कलावंतांची मांदियाळी रंगमंचावर पाेचली. त्‍यानंतर नांदी, बतावणी, नमन, वाघ्या मुरळी,दिंडी असे बहारदार कार्यक्रम एकापाठोपाठ सादर झाले. चिमुकल्‍यांच्या नृत्‍याविष्काराने देखील उपस्थितांना टाळ्या वाजविण्यास भाग पाडले. तर शेतकरी नृत्‍य, वेस्टर्न डान्स, साज ग्रुपचा कलाविष्कार, गोंधळ यामध्ये सहभागी झालेल्‍या कलाकारांनी रसिकांना आपल्यासोबत थिरकायला लावले. राजेश कदम यांचे ओघवते निवेदन, संगीतकार संदीप पेंडूरकर आणि त्‍यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेली नांदी, संजय मालंडकर यांची विनोदी नाटिका वैशिष्‍ट्यपूर्ण ठरली. साज ग्रुपच्या नृत्‍याविष्कारामध्ये नगरसेविका मेघा गांगण देखील सहभागी झाल्‍या होत्या.

कणकवली पर्यटन महोत्‍सवाचा उद्या (ता.८) समारोप होणार आहे. यात सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे, रोहित राऊत यांची मैफल रंगणार आहे. त्‍यांनतर सलमान अली नाईट हा कार्यक्रम होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × four =