You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेस कडून जागतिक महिला दिन साजरा…

राष्ट्रवादी काँग्रेस कडून जागतिक महिला दिन साजरा…

ज्येष्ठ महिलांचा केला सत्कार; जिल्हा कार्यकारणीची करण्यात आली नियुक्ती

सावंतवाडी

सावंतवाडी राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे आज जागतिक महिला दिनानिमित्त ज्येष्ठ महिलाचा सत्कार करण्यात आला. यावेळी कोरोनाचे नियम व सोशल डिस्टन्सच पालन करून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हा कार्यकारणी जाहिर करण्यात आली आहे. यामध्ये रेवती संदेश राणे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर सुहासिनी सुभाष सावंत यांची उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. रंजीता राजेश पाताडे यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर सदस्य म्हणून रेखा कदम, अफरोज राजगुरू, वैशाली प्रभू, रमिजान बटवाले, गार्गी कुलकर्णी, रेजिना डिसोजा, श्रद्धा गावकर, नम्रता बोंगाळे , योगिता गोपाळ परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर विशेष निमंत्रित कार्यकारणी सदस्य पदी नम्रता कुबल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी नेते तथा कणकवली नगरसेवक आबिद नाईक, जिल्हा उपाध्यक्ष उदय भोसले, माजी शहर अध्यक्ष सत्यजित धारणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × five =