You are currently viewing सावंतवाडीतील मोती तलावात अज्ञाताची आत्महत्या

सावंतवाडीतील मोती तलावात अज्ञाताची आत्महत्या

सावंतवाडीतील राजवाड्यासमोर अज्ञात इसमाने आपली दुचाकी रस्त्यावर लावून तात्काळ चप्पल काठावर काढून तात्काळ तलावात उडी घेत आत्महत्या केल्याची प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.


गेल्या दोन दिवसात ओटवणे येथे चारचाकी लावून आत्महत्या केलेल्या युवकाच्या मागोमाग सावंतवाडीतील तलावात आत्महत्या केली ही दुसरी घटना आहे. नगरपालिके समोर ट्रॅफिक ड्युटीवर असलेले हवालदार प्रशांत आरोलकर व सुनील नाईक सह इतरांनी तात्काळ तलावाच्या काठाकडे धाव घेतली, परंतु आत्महत्या केलेली व्यक्ती खोल पाण्यात बुडाल्याने तिला वाचविण्यात अपयश आले.


बुडालेल्या व्यक्तीला नगरपालिकेच्या मदतीने बाहेर काढण्यासाठी नगरपालिका कार्यालयाला संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + twelve =