You are currently viewing कॅन्‍सरला प्रतिबंध (Preventive Oncology) व किमोथेरपी डे केअर CME कार्यशाळेचे आज आयोजन

कॅन्‍सरला प्रतिबंध (Preventive Oncology) व किमोथेरपी डे केअर CME कार्यशाळेचे आज आयोजन

कॅन्‍सरला प्रतिबंध (Preventive Oncology) व किमोथेरपी डे केअर CME कार्यशाळेचे आज आयोजन

सिंधुदुर्गनगरी 

 सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग, व टाटा मेमोरीयल रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी कॅन्‍सरला प्रतिबंध (Preventive Oncology) व किमोथेरपी डे केअर अंतर्गत CME कार्यशाळेचे शरद कृषि भवन, सिंधुदुर्गनगरी येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्‍हाधिकारी के. मंजुलक्ष्‍मी यांच्‍या हस्‍ते होणार आहे. यावेळी जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर व विविध क्षेत्रातील तज्‍ज्ञ डॉक्‍टर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

            राज्यातील कर्करोगाचे वाढते प्रमाण पाहता सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यात लोकसंख्येवर आधारित तपासणी कार्यक्रम राबविला जातो, ज्यामध्ये ३० वर्षावरील सर्व स्त्रियांची गर्भाशय तपासणी VIA या चाचणीद्वारे केली जात आहे. या अनुषंगाने मुख्यतः आढळून येणाऱ्या कर्करोगाचे प्राथमिक टप्‍प्यात निदान करण्याकरिता तपासणी वाढविणे गरजेचे आहे.

            कॅन्‍सरला प्रतिबंध (Preventive Oncology) व किमोथेरपी डे केअर अंतर्गत CME कार्यशाळा करीता सर्व वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच सर्व समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) तसेच एनसीडी समन्वयक यांनी उपस्थिती राहण्याचे आवाहन डॉ. श्रीपाद पाटील जिल्हा शल्यचिकित्सक व डॉ. महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा