You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालय आयोजित दशावतार लोककला महोत्सवाचे उद्घाटन राजवाडा येथे थाटात संपन्न.

श्री पंचम खेमराज महाविद्यालय आयोजित दशावतार लोककला महोत्सवाचे उद्घाटन राजवाडा येथे थाटात संपन्न.

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी च्या वतीने राजवाडा येथे दशावतार लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजसाहेब खेमसावंत भोंसले यांच्या शुभहास्ते दिपप्रज्वलनाने झाले. यावेळी व्यासपीठावर राणीसाहेब सौ.शुभदादेवी खेमसावंत भोंसले, उद्योजक श्री अजय दोडिया, सौ जयश्री दोडिया, संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखम सावंत भोंसले, युवराज्ञी श्रद्धा राजे भोंसले ,
चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचे देवेंद्र नाईक, वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचे नाथा नालंग, बाबली मेस्री ,
तसेच गुजरात व मुंबई येथुन कार्यक्रमासाठी खास उपस्थित राहीलेले श्री अनिल पटेल ,कुसुम पटेल, राजीव पटेल आशा पटेल,देव पटेल, धिरल पटेल, हर्ष साबळे, मेघा देसाई ,गोकुळ तसेच संस्थेचे पदाधिकारी अॅड. शामराव सावंत, डॉ. सतीश सावंत , श्री जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.डी.एल.भारमल, राजघराण्यावर प्रेम असणारे नागरीक
नकुल पार्सेकर,प्रा.रमाकांत गावडे,प्रेमानंद देसाई पत्रकार अभिमन्यु लोंढे,अमोल टेमकर, नागेश पाटील, विनायक गावस, महाविद्यालयाचा प्राध्यापकवर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सावंतवाडीतील नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिलीप गोडकर यांनी केले .त्यांनी दशावताराची सुरुवात कधी झाली ,कोकणामध्ये दशावतार कलेचे महत्व, दशावतार मंडळी येथील कलाकार यांची माहिती दिली.
हा कार्यक्रम ज्यांच्या संकल्पनेतून आयोजित केला गेला ते संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोसले यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सावंतवाडीतील नागरीक हे आवर्जून राजवाड्यात येतील त्याचबरोबर येथील दशावतार कलेला प्रोत्साहन मिळेल असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले म्हणाले की आपल्या घराण्याने येथील पारंपरिक कलेला नेहमीच प्रोत्साहन दिलेले आहे .तिसरे खेम सावंत यांच्या काळामध्ये कर्नाटकातून आलेल्या अनेक कलाकारांना त्यांनी प्रोत्साहन देऊन राजश्रय दिला होता. राजघराणे यापुढेही नेहमीच कलेना प्रोत्साहन देईल असे आश्वासन त्यांनी दिले.
आभार प्राचार्य डॉ. डी एल भारमल यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा