You are currently viewing ईमोजी
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

ईमोजी

*खर्मा फाउंडेशन आणि मुंबई वृत्तपत्र लेखक संघ सदस्या लेखिका कवयित्री लीना वालावलकर लिखित अप्रतिम लेख*

*’ईमोजी’*

सध्याचे युग हे ऑनलाईन चे युग असुन ईमोजींना प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. दहा वाक्य लिहित बसण्यापेक्षा एक ईमोजी टाकला की झाले काम. ईमोजी जाहिरातींमध्ये, व्हिडियोंमध्ये दिसतात. २०१५ मध्ये, ऑक्सफर्ड डिकशनरींनी ईमोजीला वर्षातील शब्द म्हणुन घोषित केले होते. आज ९० टक्के लोक ईमोजींचा रोज वापर करतात. बर्याच वेळा ईमोजींना पाहुन आपण आनंदतो, कधी समाधान, कधी काळजी तर कधी वाईट वाटते. कधीतरी ईमोजींमुळे गैरसमज सुध्दा होतात यामध्ये अर्थापासून भावनेपर्यंत चुकीचा अर्थ अगदी सामान्य आहे.

 

लिहीण्यापेक्षा ईमोजींवरच भर देण्यात येतो. ईमोजींच्या अती वापरामुळे लोकांची विचार करण्याची व लिहीण्याची सवय मोडली आहे. लिहीण्यात बर्याच चुका आढळतात. जणु विचार करण्याची मतीच खुंटत चालली आहे. व्याकरणाच्या, शब्दाच्या तसेच वाक्य रचनेच्या इतक्या चुका असतात की बोलायची सोय नाही. आपण जरी वैचारिक, सामाजिक लेख लिहीला तरी कुणाला वाचायलाच वेळ नसतो किंवा वाचला तरी अभिप्राय द्यायला शब्द सुचत नाहीत बहुतांश लोक मग एक ईमोजी पाठवुन शांत राहतात. मग वाटत ईमोजींच्या या बोलघेवड्या युगात कोण एकेल माझ्या स्पंदनांची विराणी. मनुष्य हा खर तर सामाजिक प्राणी आहे त्याला इतर माणसात रहायला, बोलायला हवेहवेसे वाटते, मनापासुन आवडते पण संगणक, मोबाईल च्या नादात तो एकलकोंडा झाला आहे. तो शास्वत माणसांपासुन दूर गेला असुन त्याने आभासी जगाला जवळ केले आहे. आता त्याला हे आभासी जगच खरे वाटु लागले आहे.

ईमोजींच्या या जंजाळात लिहावेसे वाटले तरी विचार करायला मन आणि लिहायला हात धजावत नाहीत, भिती वाटते अभिप्राया एवजी ईमोजीच आला तर आणि त्याचा नेमका अर्थ जो पाठवणार्याला अभिप्रेत आहे तोच अर्थ आपल्याला उमजला नाही तर पुन्हा गैरसमज, रुसवे फुगवे. ईमोजींच्या भानगडीत पडायचेच नाही असे मनोमनी ठरवूनच टाकले आहे. ईमोजींनी लिहिण्याची, विचार करण्याची व्यापतीच बदलुन टाकली आहे. मला काय वाटते, ज्या ज्या भावना वाटू शकतात त्या त्या भावनांसाठी ईमोजी हजर असतात. आज कुणाची कथा ऐकायला कुणाला वेळच नाही, जग जवळ आले असले तरी माणुस मानसिक व भावनिक अर्थाने खूप दूर गेल्याचे जाणवते. माणुस नाती हरवत चालला आहे.

लीना वालावलकर,
कांदिवली, मुंबई.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 11 =