You are currently viewing स्मृति भाग १०

स्मृति भाग १०

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

*स्मृति भाग १०*

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .
आज आपण कात्यायन स्मृतिबद्दल पाहणार आहोत . ही स्मृति आजवर पाहिलेल्या स्मृतिपेक्षा मोठी आहे . यात एकोणतीस अध्याय येतात . अध्यायांना खण्ड नावाने संबोधले आहे . म्हणजे प्रथम अध्याय असे न म्हणता प्रथम खण्डः असे म्हटले आहे.
प्रथमखण्ड हा आचाराध्याय म्हणून यात यज्ञोपवित कर्माबद्दल चर्चा आहे . यात अठरा श्लोक येतात. दुसरा खण्ड नित्यनैमित्तिक ( श्राद्ध ) कर्म वर्णनाचा येतो . यात चवदा श्लोक समाविष्ट आहेत . तिसरा खण्ड त्रिविध क्रिया वर्णनाचा आहे . यात अक्रिया , परोक्ता क्रिया व अयथा क्रिया , या तीन क्रियांबद्दल चर्चा आहे . या खण्डात चवदा श्लोकच आहेत . चवथा खण्ड श्राद्ध वर्णनाचा येतो . यात बारा श्लोक येतात. पाचवा खण्ड पुन्हा श्राद्ध प्रकरणवर्णनाचाच आहे . यात अकरा श्लोक येतात .
सहावा खण्ड अनेक कर्म वर्णनाचा येतो . यात पंधरा श्लोक येतात . सातवा खण्ड शमीगर्भाद्यनेकप्रकरणाचा आहे . चवदा श्लोक या प्रकरणात आहेत . आठवा खण्ड हा सयज्ञस्त्रुवसमिधलक्षण वर्णनाचा आहे . यात चोवीस श्लोक आहेत . सन्ध्याकालाद्युद्दिश्यकर्मवर्णनाचा नववा खण्ड असून यात पंधरा श्लोक येतात . दहावा अध्याय प्रातःकालिक स्नानादि क्रिया वर्णनाचा आहे व यात चवदा श्लोक येतात .
अकरावा अध्याय सन्ध्योपासन विधिवर्णनाचा आहे . यात सतरा श्लोक आहेत . बारावा अध्याय तर्णविधीचा आहे . यात फक्त सहाच श्लोक आहेत . तेरावा अध्याय पञ्चमहायज्ञविधिवर्णनाचा आहे . यात चवदा श्लोक आहेत . चतुर्दश म्हणजे चवदावा खण्ड हा ब्रम्हयज्ञविधिवर्णनाचा आहे . यात पंधरा श्लोक आहेत . एकविस श्लोकांचा पंधरावा अध्याय म्हणजे खण्ड हा यज्ञविधि वर्णनाचाच आहे .
सोळावा अध्याय हा तेवीस श्लोकांचा असून श्राद्धतिथीविशेषण विधिवर्णनाचा समावेश यात आहे . सतरावा खण्ड पुन्हा श्राद्ध वर्णनाचा येतो . यात पंचवीस श्लोक यात . अठरावा अध्याय विवाहाग्निहोमविधानवर्णनाचा असून यात चोवीस श्लोक विषया संदर्भात दिलेले आहेत . एकोणवीसावा अध्याय हा सकर्तव्यतास्त्रीधर्मवर्णनाचा आहे . चोवीस श्लोकसमुच्चयाचा हा अध्याय आहे . विसावा अध्यायात द्वितियादिस्त्रीकृते सति वैदिकाग्निवर्णन विषयाचा आहे . यात एकोणावीस श्लोक आहेत .
एकवीसावा अध्याय मृतदाहसंस्कारवर्णनाचा असून सोळा श्लोक यात विषयानुसार आले आहेत . बाविसावा खण्ड पुन्हा दाहसंस्कारवर्णनाचाच आहे व दहा श्लोक यात दिलेले आहेत . तेविसवा अध्याय विदेशस्थमृतपुरुषाणां दाहसंस्कारवर्णनाचा चवदा श्लोकांचा आहे . चोवीसवा अध्याय सूतके कर्मत्यागः षोडशश्राद्धविधानवर्णनाचा सोळा श्लोकांचा आहे . मग पंचवीसवा अध्याय हा नवयज्ञेनविना नवान्न भोजने प्रायश्चित्तवर्णनाचा अहे . यात अठरा श्लोक वर्णित आहेत .
सव्वीसाव्वा अध्यायात नवयज्ञकालाभिधानवर्णन येते व यात सतरा श्लोक आहेत . सत्ताविसाव्वा अध्याय हा प्रायश्चित्तवर्णनाचा असून एकवीस श्लोकात हा पूर्ण होतो . अठ्ठावीसाव्या अध्याय म्हणजे खण्ड प्रायश्चित्तवर्णनुपाकर्मणः फलनिरुपणम् या नावाने वर्णित असून यात एकोणावीस श्लोक समाविष्ट केलेले आहेत . आता शेवटचा एकोणतिसाव्वा अध्याय हा देखिल एकोणावीस श्लोकांचा असून यात पुन्हा श्राद्धवर्णन आलेले आहे .
आतापर्यंत वर्णित सर्व स्मृतिंमधे यात विविध विषय चर्चित आहेत . माझ्या दैवी बांधवांनी काहीही कारणे न दाखवता प्रत्येक स्मृति एकदातरी वाचावी . शंकानिरसन अधिकारी वर्गाकडून होत राहील !
आज एवढे पुरेसे वाटते . उद्या याच स्मृतितील काही श्लोक पाहू .
🙏🙏
इत्यलम् ।
🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
९८२३२१९५५०/८८८८२५२२११
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

*संवाद मीडिया*

*Once in a lifetime offer*
*डिसेंबर धमाका*

सर्वोत्तम संधी..सर्वोत्तम कार्स करिता..
*अशी संधी पुन्हा नाही*
किँमत वाढण्या पूर्वी खरेदी करा.

सर्व ऑफर केवळ २५ डिसेंबर पर्यंतच

५ स्टार ग्लोबल एन कॅप रेटिंग युक्त
टियागो आणि टिगोर सी. एन.जी. वर
*आर. टी. ओ.टॅक्स पुर्ण पणे मोफत*

अलट्रोझ पेट्रोल आणि डिझेल वर
*इन्शुरन्स फ्री*

अलट्रोझ सी. एन. जी. वर
*अक्सेसरिज पॅक फ्री*

एक्सिस्टिंग जनरेशन नेक्सोंन वर
*₹.८००००/- पर्यन्त चे फायदे*

या व्यतिरिक्त फायनान्स आणि जुनी कार एक्सचेंज केल्यास
*₹.३५००० पर्यन्त चा अतिरिक्त डिस्काउंट*

अन लिमिटेड किलोमीटर वॉरंटी देखील उपलब्ध

१००% ऑन रोड फायनान्स, एक्सचेंज, डेमो आणि टेस्ट ड्राईव्ह करिता आजच भेट द्या अथवा कॉल करा

*एस. पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली
*7377-959595*

नोट:- दि.२० डिसेंबर पर्यंत
*मिड नाईट कार्निवल* अंतर्गत
खास आपल्या सोयी करिता सर्व ठिकाणचे शो रूम रात्री उशिरा पर्यंत सुरू राहतील.

*Advt Web link👇*
https://sanwadmedia.com/119371/
*———————————————-*
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 5 =