You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या समस्या सोडवा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या समस्या सोडवा

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या समस्या सोडवा*

*अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची भेट घेत जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे आवाहन*

*महावितरणला केली वीज ग्राहकांच्या समस्यांची यादीच सादर*

सिंधुदुर्ग जिल्हा वीजग्राहक संघटनेने जिल्ह्यातील विविध भागात वीज ग्राहकांसोबत आढावा बैठका घेतल्या असता जिल्ह्यातील वीज ग्राहकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे लक्षात आले आहे. तसेच यातील बर्‍याच समस्यांचे अनेक वर्ष महावितरणकडून निराकरण न झाल्याचे समजले आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांना भेडसावणार्‍या समस्यांचे तात्काळ निराकरण करून वीज ग्राहकांना न्याय द्यावा अशी विनंती जिल्हा वीज ग्राहक संघटनेने कुडाळ येथे दिनांक ३१ ऑगस्ट रोजी अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची भेट घेत केली. यावेळी वीज ग्राहक संघटना जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर, जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट, कुडाळ तालुकाध्यक्ष श्री गोविंद सावंत, द्वारकानाथ घुर्ये, आदी वीज ग्राहक संघटना पदाधिकारी, व्यापारी संघ पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
अधीक्षक अभियंता श्री. विनोद पाटील यांना खालील प्रमाणे जिल्ह्यातील विविध उपविभागातील समस्यांचे लेखी निवेदन सादर करून तात्काळ समस्यांचे निवारण करण्याचे सांगण्यात आले.

उपविभाग- सावंतवाडी
आवश्यक ठिकाणी कायमस्वरूपी वायरमनची नियुक्ती करणे.
ग्रामीण भागात अखंडित विजपुरवठ्यासाठी शाश्वत उपाययोजना करणे.
निष्क्रिय कर्मचार्‍यांच्या कामाचा अहवाल तपासून त्यांच्यावर योग्यती कारवाई करणे.
कमी दाबाच्या वीज पुरवठ्यावर उपाययोजना करणे.
माडखोल येथे कायमस्वरूपी वायरमनची नियुक्ती करणे.
सावंतवाडी शहरात विद्युत वाहिन्यांना गार्डिंगची व्यवस्था करणे.

उपविभाग- कुडाळ
कुडाळ शहरासाठी आवश्यकते प्रमाणे किमान 10 ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देणे.
कुडाळ उपविभागीय क्षेत्रातील जीर्ण झालेले खांब तात्काळ बदलणे.
कुडाळ शहरात भूमिगत विद्युत वाहिनी संदर्भात पाहणी करून कार्यवाही करणे.

उपविभाग – कणकवली
कलमठ गावात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून यावर शाश्वत उपाययोजना करणे.
नांदगाव मध्ये गेली दोन वर्ष कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे, यामुळे विद्युत यंत्रांचे नुकसान होत असल्याने उपाययोजना कराव्यात.
वैभववाडी शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन गेली दोन वर्षे तेथील व्यापार्‍यांनी मागणी करूनही उपाययोजना केलेल्या नाहीत. तरी तेथील विविध प्रश्न समजून त्याचे निराकरण करणे.
कणकवली शहरातील सोणगेवाडी येथे देवगडवरील लाइन असल्यामुळे तिथे कायम लाईटचा त्रास उद्भवतो तरी याभागात कणकवली येथून विद्युत पुरवठा करण्यात यावा.

उपविभाग – वेंगुर्ला
1) सडलेले वीज पोल तात्काळ बदलून मिळावेत.
2) नादुरुस्त वीज मीटर त्वरित बदलून मिळावेत.
3) मंजूर ट्रान्सफॉर्मर लवकरात लवकर बसवण्यात यावेत.
4) वीज बिलांची दुरुस्ती करून देण्याचे अधिकार उपविभागातील अधिकार्‍यांना द्यावेत.
5) शेतकऱ्यांच्या बागेतून, घरावरून गेलेल्या वीज, पोल तसेच तारा यांचे शिफ्टींग लवकरात लवकर करण्यात यावे.

उपविभाग – ओरोस
कसाल ते सोनवडे हा फीडर जिल्ह्यातील सर्वात जास्त लांबीचा (सुमारे 36 किमी) एवढा असून येथील मेन लाइन सन 1972 मध्ये विद्युत जोडणी केल्यापासुन आजतगायत लाइन अथवा पोल बदललेले नाहीत. सबब याभागातील वीज ग्राहकांना कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने विविध विद्युत उपकरणांमध्ये बिघाड होऊन आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. तसेच याभागात वीज खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
आंब्रड पंचक्रोशीमध्ये दोन महाविद्यालये व पाच माध्यमिक विद्यालये असल्याने वारंवार खंडित होणार्‍या वीजेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
यावर उपाय म्हणून आंब्रड येथे सबस्टेशन होणे आवश्यक
वाटते अथवा घोडगे, सोनवडे, कुपवडे, भरणी या गावांना कनेडी सबस्टेशन वरून विद्युत पुरवठा करणे सोयिस्कर वाटते व कुंदे, कुसबे, पोखरण व आंब्रड या गावांना बोर्डवे (ता.कणकवली) येथून विद्युत पुरवठा करणे सोयिस्कर वाटते.
कुंदे, कुसबे, पोखरण, आंब्रड या गावांना कायमस्वरूपी वायरमन मिळणे आवश्यक आहे.
कळसुली फीडर वरुन आवश्यक त्यावेळी आंब्रड पंचक्रोशीत विद्युत जोडणीची तरतूद करावी.
ढोकमवाडी येथे नवीन ट्रान्स्फॉर्मर बसविणे व लाईन स्वतंत्र करणे.
कार्लेवाडी येथील कसाल ग्रामपंचायत नळयोजनेसाठी वीजपुरवठा होत असलेल्या ट्रान्स्फॉर्मरची क्षमता वाढविणे.
कसाल बाजारपेठतील स्मशानभूमी साठी 2 पोल टाकणे.
या सर्व विषयांबरोबरच मुख्य म्हणजे जिल्ह्यातील सर्व उपविभागांमध्ये दिनांक 10 ऑक्टोबर 2023 ते 15 ऑक्टोबर 2023 या कालावधीत ग्राहक मेळावे आयोजित करणे व
सिंधुदुर्ग जिल्हयासाठी पी.आर.ओ.ची नियुक्ती करणे.
अशा अनेक विषयांवर तात्काळ निर्णय घेऊन जिल्ह्यातील वीज ग्राहकांचे हित साधण्याचा प्रयत्न महावितरण कडून व्हावा असे आवाहन वीज ग्राहक संघटना जिल्हा सिंधुदुर्ग कडून करण्यात आले.

*संवाद मीडिया*

🚇🚆🚆रेल्वेकडून विशेष सहलीची योजना, इन्डियन रेलवे केटरिंग व टूरिज़म कडून ‘ *उत्तर भारत देवभूमी यात्रा* भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’ लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन 🚊🚉
चला मग, भारत गौरव ट्रेनने *हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि माता वैष्णोदेवीचे दर्शन आणि मथुरा* फिरुया.

स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
निर्गमन- दि. 28/10/23 ते 05/11/23 (08 रात्र आणि 09 दिवस)
प्रवास खर्च फक्त:-
Package Category
1) Economy (SL)
₹ 15,300/-
2) Comfort (3AC)
₹ 27,200/-
3) Deluxe (2AC)
₹ 32,900/-

ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-
28/10/23 – पुणेहुन प्रवास सुरुवात
29/10/23 – हरिद्वार येथे आगमन. हॉटेल चेक इन (हरिद्वार येथे रात्री मुक्काम). 30/10/23 – सकाळी न्याहारी नंतर ऋषिकेशचे स्थानिक प्रेक्षणीय स्थळ आणि हर की पौरी येथे गंगा आरती. नंतर अमृतसरकडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
31/10/23 – अमृतसरला आगमन आणि सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डरला भेट. नंतर कटरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
01/11/23- कटरा येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता हॉटेल चेक इन करून आणि माता वैष्णोदेवी दर्शनासाठी पूर्ण दिवस (कटरा येथे रात्री मुक्काम).
02/11/23 – संध्याकाळी मथुरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
03/11/23 – मथुरा येथे आगमन, फ्रेश होऊन नंतर वृंदावन आणि कृष्णजन्म-भूमीला भेट देणे संध्याकाळी उशिरा परतीचा प्रवास सुरू (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
04/11/23 – ट्रेन प्रवास
05/11/23 गोड आठवणीने प्रवास समाप्त पुणे
बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग पॉईंट्स: पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड-वापी-सुरत-वडोदरा

समाविष्टितसेवा व् सुविधा-
1) Economy Category – Sleeper class Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in Non AC Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on Multi Share in Non AC Hotel Room (Maximum 5 PAX in One Room), Non AC Transport

2) Comfort Category 3AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

3) Deluxe Category –2AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क* – *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
☎️ *7350 7350 91/7350 534 534*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107588/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा