You are currently viewing डॉ.तेजराव नरवाडे यांना जीवनगौरव पुरस्कार

डॉ.तेजराव नरवाडे यांना जीवनगौरव पुरस्कार

पद्मश्री डॉ. विजयकुमार शाह यांच्या हस्ते वितरण

सांगली :

सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी व सध्या सांगली जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असणारे श्री विशाल नरवाडे यांचे वडील डॉ.तेजराव नरवाडे यांना अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आयएएस या उपक्रमा अंतर्गत जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात येणार आहे. डॉ. तेजराव नरवाडे हे बुलढाणा जिल्ह्यातील सावळी या गावाचे प्रतिष्ठित नागरिक असून त्यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्य केलेले आहे .याशिवाय विदर्भातील सामाजिक शैक्षणिक व वैद्यकीय सेवेत ते सदैव अग्रेसर राहिलेले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी आपल्या चिरंजीवांना योग्य ती दिशा देऊन त्यांना आय ए एस करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे. त्यांनी आपल्या मुलाबरोबरच इतरही मुलांना स्पर्धा परीक्षेची प्रेरणा देऊन त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रेरित केलेले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अमरावतीच्या सुप्रसिद्ध अशा डॉ. पंजाबराव देशमुख आयएस अकादमीच्या मिशन आयएएस या उपक्रमाने त्यांना जीवन गौरव पुरस्कार देण्याचे ठरविले आहे.

 

हा जीवन गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यवसायी व पद्मश्री डॉ.विजयकुमार शाह यांच्या हस्ते सांगली येथे बुधवार दि. 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता प्रदान करण्यात येणार आहे. त्यांना जीवन गौरव पुरस्कार घोषित झाल्यानंतर विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. सामाजिक शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तव्यदक्ष व कर्तव्यतत्पर डॉ.तेजराव नरवाडे यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांच्या मित्रमंडळीने सांगली येथे या पुरस्काराचा प्रदान सोहळा आयोजित केला आहे अशी माहिती डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीच्या मिशन आयएएस या प्रकल्पाचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा