You are currently viewing नांदोस गावातील शेतकऱ्यांना सेलम हळद बियाण्याचे वाटप

नांदोस गावातील शेतकऱ्यांना सेलम हळद बियाण्याचे वाटप

शिवस्वप्न शेतकरी उत्पादक कंपनी लि. मालवण व फार्मस्केप इम्पॅक्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बियाणांचे वितरण..

मालवण :

दि. १० जुलै २०२२ रोजी शिवस्वप्न शेतकरी उत्पादक कंपनी लि. मालवण व फार्मस्केप इम्पॅक्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण तालुक्याच्या नांदोस गावातील शेतकऱ्यांना सेलम जातीच्या हळद बियाण्याचे वितरण करण्यात आले.

या वितरणावेळी शिवस्वप्न शेतकरी उत्पादक कंपनी लि. मालवण च्या संचालिका सौ.स्वप्नाली गावडे,संचालक श्री. प्रणय सावंत, संचालक श्री.विरेश पवार व फार्मस्केप इम्पॅक्ट फाउंडेशनचे अधिकारी श्री.अनिरूध्द मेस्त्री उपस्थित होते.

या उपक्रमाच्या वेळी फार्मस्केप फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांकडुन शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीबद्दल प्रशिक्षण देण्यात आले. तसेच शिवस्वप्न कंपनीच्या संचालकांकडुन हळद लागवडीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांकडुन मालवण मधील तरूण व महिलांनी जास्तीत जास्त शेती व शेती पुरक व्यवसायांकडे वळण्याचे आवाहन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × four =