You are currently viewing वैभववाडी महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर सांगुळवाडी येथे सुरू

वैभववाडी महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर सांगुळवाडी येथे सुरू

वैभववाडी

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय विशेष संस्कार निवासी शिबिर दिनांक ४ जानेवारी पासून प्राथमिक शाळा सांगुळवाडी येथे सुरू झाले.
या शिबिराचा उद्घाटन समारंभ दिनांक ४ जानेवारी रोजी संपन्न झाला. या शिबिराची थीम “आजादी का अमृत महोत्सव युवकांचा ध्यास, ग्राम- शहर विकास” असे निर्धारित करण्यात आले आहे. शिबिरात ग्रामसुधारणा आणि श्रमप्रतिष्ठा संवर्धनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास उंचावण्याच्या दृष्टीने उपक्रम राबविले जाणार आहेत. विविध विषयांवर बौद्धिक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक समिती अध्यक्ष सज्जन काका रावराणे यांनी शिबिरार्थींना ग्रामविकासामध्ये युवकांची भूमिका किती महत्त्वाची आहे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले श्री.विजय रावराणे यांनी स्वयंसेवकांना श्रमसंस्कार शिबिरातून चांगली मूल्ये आत्मसात करून भविष्यात उपयोग करा असे आवाहन केले. श्री.यशवंत रावराणे यांनी श्रमसंस्कारातून उद्योजकतेकडे वळण्याचा मोलाचा संदेश दिला. तसेच श्री.प्रभानंद रावराणे यांनी जे काम करा ते प्रामाणिकपणे व उत्कृष्ट करा असे सुचित केले.श्री.शरद रावराणे यांनी शिबीराला शुभेच्छा देऊन योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहलता राणे यांनी शिबिरार्थींना युवा पिढी आणि त्यांचे बदलते वर्तमान याविषयी मार्गदर्शन केले. माजी सरपंच गौरी रावराणे यांनी निवासी शिबिर व स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ.सी.एस. काकडे यांनी एनएसएस योजनेचे ब्रिद, उद्दिष्टे व ध्येय याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर विद्याधर सावंत, समीर रावराणे, श्री.पाटेकर, डॉ.एन.व्ही.गवळी, प्रा.ए.एम कांबळे, श्री संजय रावराणे, कार्यक्रम अधिकारी डॉ.एम.ए.चौगुले, डॉ.एस.सी.राडे,प्रा. राहुल भोसले, प्रा. पी. एम. मांजरेकर, प्रा.एस.एन.पाटील, बाळाजी रावराणे, गणेश रावराणे उपस्थित होते.


या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संजीवनी पाटील यांनी केले तर आभार प्रा.राहूल भोसले यांनी मांडले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा