You are currently viewing शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राणी पार्वती देवी हायस्कूल व जुनिअर कॉलेज वार्षिक स्नेहसंमेलन ४ व ५ जानेवारी रोजी

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राणी पार्वती देवी हायस्कूल व जुनिअर कॉलेज वार्षिक स्नेहसंमेलन ४ व ५ जानेवारी रोजी

सावंतवाडी

सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राणी पार्वती देवी हायस्कूल व जुनिअर कॉलेज सावंतवाडी अमृत महोत्सव वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ येत्या दि.४ व ५ जानेवारी रोजी होत आहे .
यावेळी वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण आदर्श शिक्षक आदर्श विद्यार्थी पुरस्कार विशेष सत्कार साहित्य अकादमी पुरस्कार साहित्य प्रवीण बांदेकर व विविध गुणदर्शन कार्यक्रम दि.४ व ५ जानेवारी रोजी होणार आहे.
या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन बुधवार दि ४ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था चालक-मालक संघ तथा राज्य बँक उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर उपस्थित राहतील.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष विकास सावंत , सी एल नाईक, डॉ दिनेश नागवेकर व मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत असे प्राचार्य जगदीश धोंड, उपमुख्याध्यापक शेखर नाईक ,उपप्राचार्य सुमेधा नाईक यांनी म्हटले आहे.
राणी पार्वतीचे हायस्कूलच्या नवरंग कला मंचावर कार्यक्रम होणार आहेत या निमित्ताने रंगवली प्रदर्शन व हस्तकला प्रदर्शनीचे उद्घाटन होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + seventeen =