You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हा महिला अध्यक्ष ॲड.सौ. रेवती राणे यांच्या नेतृत्वाखाली योगी सरकारचा निषेध..

राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हा महिला अध्यक्ष ॲड.सौ. रेवती राणे यांच्या नेतृत्वाखाली योगी सरकारचा निषेध..

योगी सरकार हाय हाय, उत्तरप्रदेश पोलिसांचा निषेध अशा घोषणा देत सिंधुदुर्ग जिल्हा महिला जिल्हा अध्यक्ष रेवती राणे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी केला निषेध !!!!

सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडुन सावंतवाडी कॉलेज चौकात महिला एकत्र येऊन उत्तरप्रदेश येथील युवती वर केलेल्या अत्याचाराच्याविरुद्ध रस्त्यावर उतरून योगी सरकारचा निषेध असो, उत्तर प्रदेश सरकार हाय हाय, उत्तरप्रदेश पोलीसांना निलंबित करा अशा घोषणा देत महिलांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष रेवती राणे, प्रदेश सरचिटणीस – सुरेश गवस, प्रांतिक सदस्य उदय भोसले, रंजना निर्मल, अंकिता देसाई, नम्रता सावंत ॲड.आरती पवार, तनया देसाई, निधि पास्ते, मिताली देशमुख, स्नेहल शिवलकर, प्रतीक्षा सावंत, सायली पेंडूरकर, दिशा पेंडूरकर, निशीगंधा सावंत, मागासवर्गीय सेलचे जिल्हा अध्यक्ष विजय कदम, एम. डी. सावंत, योगिता राऊळ, शहराध्यक्ष धारणकर, विमुक्त व भटक्या जाती अध्यक्ष अशोक पवार, आकेरी माजी सरपंच संदीप राणे, अमोल पालव, सगुण पालव, कु. कदम या सर्वांनी यावेळी सावंतवाडी तहसीलदार श्री. म्हात्रे यांना मागासवर्गीय जिल्हा अध्यक्ष विजय कदम यांच्या तर्फ़े निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + 18 =