You are currently viewing मैदानी खेळ शरिराला तंदुरुस्त बनवतात: दिनेश गेडाम

मैदानी खेळ शरिराला तंदुरुस्त बनवतात: दिनेश गेडाम

“बॅ.नाथ पै नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च अकॅडमी कुडाळ च्या वार्षिक क्रीडा महोत्सवास सुरुवात.

कुडाळ

“मैदानी खेळ हे जसे शरीराला तंदुरुस्त बनवतात तसेच ते मनालाही शक्तीवर्धक असतात. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती निर्माण करण्याचे काम या सर्व प्रकारच्या क्रीडा प्रकारांमुळे होते आणि म्हणूनच विद्यार्थी दशेत खेळाला अनन्य साधारण महत्त्व आहे “,अशा शब्दात ५८ महाराष्ट्र बटालियन चे सुभेदार -मेजर दिनेश गेडाम यांनी आपले विचार मांडले ,बॅ. नाथ पै नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च अकॅडमी कुडाळ आयोजित वार्षिक क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी त्यांनी खेळाचे महत्त्व व त्याचे आपल्याला होणारे फायदे याबाबतचे महत्त्व उपस्थित विद्यार्थी -विद्यार्थिनींना पटवून दिले. खिलाडू वृत्ती ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याचे उगमस्थान म्हणजे हे सर्व क्रीडा प्रकार असेही ते आपल्या पुढील भाषणात म्हणाले . यावेळी व्यासपीठावर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुरजीत सिंग ,नर्सिंग कॉलेजच्या उपप्राचार्य सौ.कल्पना भंडारी, प्राध्यापिका सौ .वैशाली कोलगावकर,बॅ.नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ. सुरज शुक्ला,बॅ.नाथ पै बी.एड कॉलेज प्राचार्य श्री .परेश धावडे ,बॅ.नाथ पै सिनियर कॉलेज प्राचार्य श्री .अरुण मर्गज तसेच श्रीमती नंदिनी देशमुख उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा