You are currently viewing सरपंचांनी काम असे करावे कि,पुढच्या निवडणुकीत तुमच्या नावावर लोक निवडून आले पाहिजेत- आ. वैभव नाईक

सरपंचांनी काम असे करावे कि,पुढच्या निवडणुकीत तुमच्या नावावर लोक निवडून आले पाहिजेत- आ. वैभव नाईक

कणकवलीतील नवनिर्वाचित सरपंच, ग्रा.पं.सदस्यांचा खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक,अरुण दुधवडकर यांच्या हस्ते सत्कार

ग्रामपंचायत निवडणुकीत कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी घेतलेली गरुड झेप हि उद्या या विधानसभेवर भगवा फडकविणारी गरुड झेप ठरेल यात कोणतीही शंका नाही. असे सांगत खासदार विनायक राऊत यांनी कौतुकोउद्गार काढले. त्याचबरोबर नितेश राणेंवर निशाणा साधत नारायण राणेंच्या राजकीय कारकीर्दीत जेवढे खून झाले. जेवढे लोक बेपत्ता झाले. त्या सगळ्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे नाहीतर नारायण राणेंची नार्को टेस्ट करण्यात यावी असे घणाघाती टीका खा. विनायक राऊत यांनी केली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा आज कणकवलीतील मातोश्री मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सरपंच उपसरपंच व सदस्यांना गौरविण्यात आले.
खासदार विनायक राऊत म्हणाले, येथील आमदाराची उंची किती डोकं केवढं त्याच्यात अक्कल केवढी, मेंदू केवढा तरीही आकांडतांडव करायचा. उद्धवजी आदित्य यांच्यावर टीका करण्याचे एकच टार्गेट. हे करताना नितेश राणेने वडिलांची राजकारणातील कारकीर्द आठवावी. सख्या चुलत भावाचे घराच्या समोर डोकं फोडून गाडीत घालून नांदगावला नेऊन जाळून टाकलं असा राणेंचा इतिहास. नारायण राणेंच्या राजकीय कारकीर्दीत जेवढे खून झाले. जेवढे लोक बेपत्ता झाले. त्या सगळ्यांची एसआयटी चौकशी झाली पाहिजे नाहीतर नारायण राणेंची नार्को टेस्ट करण्यात यावी. जेणेकरून रक्तरंजित इतिहास कोणी घडविला हे सर्वांना कळेल. परंतु २०१४ नंतर शिवसेनेची सत्ता जिल्ह्यात आल्यानंतर एकही राजकीय बळी गेला नाही. आम्हाला जिल्ह्यात शांतात हवी आहे.जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे.असे खासदार विनायक राऊत यांनी ठणकावून सांगितले.
आ. वैभव नाईक म्हणाले, गावातील ग्रामस्थांनी आपल्याला निवडून देताना गावाच्या विकासाची जबाबदारी दिली आहे.आज शिवसेनेची सत्ता नसली तरी गावाच्या विकासासाठी जे जे सहकार्य लाभेल ते शिवसेना नेते करतीलच. परंतु जिल्ह्यातील आमदार म्हणून प्रशासकीय पातळीवर आपल्याला जे सहकार्य लागेल ते करणार आहे. राज्यातील राजकीय घडामोडी नंतर झालेली हि पहिली निवडणूक जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध भाजप मध्ये होती. चार चार मंत्र्यांनी प्रचार करून,पैसा वापरून,निधी न देण्याच्या धमक्या देऊन भाजपने निवडणूक लढवली असली तरी जनता शिवसेनेच्या पाठीशी राहिली.सरपंचांकडून ५ वर्षात एवढं चांगलं काम झालं पाहिजे कि पुढच्या निवडणुकीत तुमच्या नावावर इतर लोक निवडून आले पाहिजेत. एवढी आपली ताकद वाढविली पाहिजे. कोणत्याही अमिषाला बळी न पडता ज्या लोकांनी आपल्याला शिवसैनिक म्हणून निवडून दिले त्यांच्याशी आणि पक्षाशी प्रामाणिक राहिले पाहिजे. असे आवाहन आ. वैभव नाईक यांनी केले.
अरुण दुधवडकर यांनी शिवसेनेच्या प्रतिकूल परिस्थितीत निवडून आलेल्या सरपंच यांचे कौतुक केले. लोकांना दीर्घकाळ लक्षात राहील असे काम सरपंचांनी करावे. अडचणी असतील त्या आम्हाला सांगाव्यात. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे सरकार येणार आहे.त्यामुळे कणकवली विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज रहा असे आवाहन त्यांनी केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना युवानेते संदेश पारकर, अतुल रावराणे यांनीही विचार व्यक्त करत नूतन सरपंच, उपसरपंच, व सदस्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हा संघटक नीलम पालव,कणकवली विधानसभा प्रमुख सचिन सावंत,तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत नगरसेवक कन्हैया पारकर,हर्षद गावडे, वैदेही गुडेकर, संदीप कदम, मज्जिद बटवाले, राजु रावराणे, निसार शेख, विलास गुडेकर, रुपेश आमडोसकर, मंगेश सावंत,अनुप वारंग, आनंद आचरेकर, बंडू ठाकूर, प्रमोद कावले, सुदाम तेली, दादा भोगले, प्रमोद सावंत, नितीश भिसे,उत्तम वाळके, आप्पा तावडे आदींसह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 3 =