You are currently viewing ११ नोव्हेंबर रोजी सावंतवाडी मोती तलावाकाठी ‘एक दिवा सैनिकांसाठी’ अभिनव उपक्रमाचे आयोजन

११ नोव्हेंबर रोजी सावंतवाडी मोती तलावाकाठी ‘एक दिवा सैनिकांसाठी’ अभिनव उपक्रमाचे आयोजन

सावंतवाडी :

 

 

अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्यावतीने शनिवारी ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता श्रीराम वाचन मंदिर समोर मोती तलावाकाठी ‘एक दिवा सैनिकांसाठी’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सिमेवर देशाच्या संरक्षणामध्ये शहीद झालेल्या आणि सध्या देशसेवा बजावत असलेल्या जवानांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘चला कृतज्ञता व्यक्त करूया, एक दिवा सैनिकांसाठी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सावंतवाडी शहरातील सर्व नागरीक व समाजसेवी संघटनांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 3 =