देवगड
देवगड महाळूंगे येथील पूर्ण प्राथमिक शाळा राणेवाडी येथे मुंबईच्या सेवा सहयोग या संस्थेच्या वतीने विद्यार्थांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यात दप्तर,कंपास,चित्रकला वही व लेखन साहित्य याचा समावेश होता,अमृत मोहत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त 75000 विद्यार्थांना सेवा सहयोग या संसथेतर्फे वाटप केले असल्याचे संयोजक उमेश सावंत यांनी सांगितले
महाळूंगे येथील कार्यक्रमात गावचे सरपंच संदीप देवळेकर,शाळा व्यवस्थापन समितचे अध्यक्ष संदीप राणे,तंटामुक्ती अध्यक्ष रामकृष्ण राणे,मुख्याध्यापक सुनील मांजरेकर,सुरेश राणे,सतीश घाडी आदी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम दवडीवर यांनी केले तर आभार सुरेखा मोहिते यांनी मानले