You are currently viewing वेंगुर्ले रेडी समुद्रात पर्यटक बुडाला ; जीवरक्षकामुळे वाचले प्राण

वेंगुर्ले रेडी समुद्रात पर्यटक बुडाला ; जीवरक्षकामुळे वाचले प्राण

वेंगुर्ला

वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी उरतलेल्या दिल्ली येथील पर्यटक परवेझ खान पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. मात्र त्याच वेळी रेडी येथील जीवरक्षक संजय गोसावी यांनी त्याला बुडताना किनाऱ्या वरून पाहिले असता जीवाची पर्वा न करता खोल समुद्रात जाऊन बुडणाऱ्या खान याला वाचवून सुखरूप पाण्याबाहेर काढले. त्यामुळे जीवरक्षकाच्या या धाडसी कृतीचे गावात अभिनंदन होत आहे.

आज दिनांक ३० डिसेंबर रोजी रेडी येथील यशवंतगड येथे फिरण्यासाठी आलेल्या दिल्ली कबीर नगर, शहादरा येथील पर्यटक परवेझ खान यांना येथील समुद्र किनाऱ्याची भूरळ पडली. त्यांना समुद्राच्या पाण्यात उतरून पोहण्याचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे ते दुपारी २.४५ वा. चे मनाने रेडी यशवंतगड येथील समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले. मात्र पाण्याबरोबर पुढे पुढे जाताना त्यांना पाण्याचा व लाटांचा अंदाज न आल्याने ते बुडाले. त्यांना बुडताना रेडी येथील जीवरक्षक संजय गोसावी यांनी किनाऱ्यावरून पाहिले. तत्काळ त्यांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारून त्यांना सुखरूप बाहेर काढले आणि वाचवले. याबाबत खान यांनीही गोसावी यांचे आभार मानले. तर रेडी सरपंच रामसिंग राणे आणि वेंगुर्ला पोलीस ठाण्यातर्फे गोसावी यांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा