You are currently viewing सावंतवाडीत समता प्रेरणाभूमी व सामाजिक न्याय हक्क समितीच्या वतीने “शौर्य दिन” साजरा…

सावंतवाडीत समता प्रेरणाभूमी व सामाजिक न्याय हक्क समितीच्या वतीने “शौर्य दिन” साजरा…

सावंतवाडी

भीमा कोरेगाव येथे दोनशे वर्षांपूर्वी घडलेल्या शौर्य दिनाच्या स्मृतीला आज समता प्रेरणाभूमी व सामाजिक न्याय हक्क समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन करण्यात आले. येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरात हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी ॲड एस.व्ही.कांबळे यांनी शौर्य दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. तर प्रेरणाभूमीचे सचिव मोहन जाधव, ॲड कांबळे व मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी दि.के. पडेलकर, ॲड कांबळे यांच्यासह अंकुश कदम, विठ्ठल कदम, चंद्रशेखर जाधव, यशवंत डीगणेकर, संजय कदम, संदीप पिंगुळकर, परेश जाधव, शांताराम असनकर, प्रभाकर जाधव,आर.जी.चौकेकर, गौतम कांबळे, सद्गुरू जाधव, अनंत कदम, भावना कदम, रश्मी पडेलकर, ममता जाधव, चंद्रशेखर जाधव व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सांगेली येथील ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य भिकाजी कदम यांचा सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा