You are currently viewing जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन; 2 जानेवारी  रोजी  सिंधुदुर्गनगरीत

जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन; 2 जानेवारी  रोजी  सिंधुदुर्गनगरीत

सिंधुदुर्गनगरी

युवा महोत्‍सवाच्‍या आयेाजनाची सुरुवात जिल्‍हा पातळीवरुन होते. जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने सन 2022-23 मध्‍ये दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3.00 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी सिंधुदुर्गनगरी ता.कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे जिल्‍हास्‍तर युवा महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात येणार आहे.  युवा महोत्‍सवामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपली नाव नोंदणी स्पर्धापूर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे करावी. तसेच सहभागाबाबत  प्रवेशिका sindhusports@yahoo.com या ईमेल आयडीवर दिनांक 1 जानेवारी 2023 पर्यंत पाठविण्यात यावे.  जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक – युवती / संघांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.

या युवा महोत्‍सवामध्‍ये  लोकनृत्‍य,  लोकगीत या बाबींचा समावेश आहे. जिल्‍हास्‍तर युवा महोत्‍सवामध्‍ये सहभागी होण्‍याकरीता जिल्‍ह्यातील 15 ते 29 वयोगटातील युवक युवतींना सहभागी होता येईल.

       केंद्र शासनाच्‍या क्रीडा व युवक कल्‍याण विभागाच्‍या वतीने प्रतिवर्षी 12 जानेवारीला राष्‍ट्रीय युवा महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात येते. यामध्‍ये देशातील विविध राज्‍यातून आलेल्‍या संघामध्‍ये सहभागी युवक युवती आपल्‍या कलांचे सादरीकरण करत असतात. याच धर्तीवर राज्‍यामध्‍ये राष्‍ट्रीय एकात्‍मता तसेच युवकांच्‍या सुप्‍त गुणांना वाव देण्‍यासाठी तसेच राज्‍याची संस्‍कृती व परंपरा जतन करण्‍यासाठी शासनाच्‍या वतीने  क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून जिल्‍हा, विभाग व राज्‍य पातळीवर युवा महोत्‍साचे आयेाजन करण्‍यात येते. राज्‍यपातळीवर उत्‍कृष्‍ट सादरीकरण करणा-या युवक युवतींना राज्‍यातर्फे राष्‍ट्रीय युवा महोत्‍सवामध्‍ये सहभागी होण्‍याची संधी प्राप्‍त होते. कला क्षेत्रामध्‍ये उच्‍चतम कामगिरी करणा-या युवक युवतींना व कला क्षेत्रातील व्‍यक्तिंना शासनाकडून विविध प्रकारे सुविधा व सवलती देण्‍यात येतात.

जिल्हास्तर युवा महोत्सव आयोजन नियमावली पुढीलप्रमाणे आहे. 1.   सहभागी युवक /युवती १५ ते २९ वयोगटातील असावा. 2.   ज्या बाबींना साथसंगत आवश्यक आहे, त्या कलाकरांना वयोमर्यादा लागु नाही.  3.      सहभागी होणारे युवक / युवती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहीवाशी असणे आवश्यक 4.    लोकगीत व लोकनृत्य या प्रकारातील गीते शक्यतो चित्रपट बाह्य असावीत. 5.     सहभागी कलाकारांनी आवश्यक असणारे साहीत्य स्व:तच्या जबाबदारीवर आणावे.

अ.क्र. बाब सहभाग संख्या वेळ
1 लोकनृत्य 20 15 मिनिट
2 लोकगीत 6 7 मिनिट

लोकनृत्य-  1) स्पर्धक संख्या 20 पर्यंत मर्यादित राहील. ही संख्या युवक आणि युवती दोन्ही मिळून 20 पर्यंतच राहील. 2) नृत्य हे भारतीय पध्दतीचे लोकनृत्य असावे. इतर नृत्य प्रकार चालणार नाहीत. 3) नृत्यासाठी अधिकतम 15 मिनीटे वेळ दिला जाईल. 4) मंचव्यवस्था करण्यासाठी केवळ 5 मिनिटांचा वेळ दिला जाईल.5) नोंदणी करतेवेळी प्रवेश अर्जासह गीताचे बोल आणि थिम  याच्या तीन प्रती सादर करण्यास याव्या. 6) कला सादर झाल्यानंतर संबंधित संघाने त्वरीत रंगमंच पुढील संघाकरिता उपलब्ध करुन देणे आवश्यक. 7) परिक्षण हे ताल, नृत्य दिग्दर्शन, वेषभुषा, रंगभुषा, संच आणि एकंदर प्रभाव यावर आधारित राहील. 8. या प्रकारामध्ये पूर्व ध्वनिमुद्रित संगीत (टेप, कॅसेट इ.) यांचा वापर करता येणार नाही.

लोकगीत – 1) संघातील स्पर्धकांची संख्या जास्तीत जास्त 6 पर्यंत असणे आवश्यक.2) लोकगीत हे कोणत्याही भारतीय भाषेतील असावेत. 3) कोणत्याही प्रकारचे चित्रपट गीत सादर करता येणार नाही. 4) लोकगीतासाठी 7 मिनिटांचा वेळ राहील. मंच व्यवस्थेकरिता  अधिकची 4 मिनिटे वेळ देण्यात येईल. 5) या प्रकाराचे परिक्षण हे केवळ गायनावर आधारित राहील.

प्रतिक्रिया व्यक्त करा