You are currently viewing कणकवली तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर…

कणकवली तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर…

कणकवली

कणकवली  पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात संतोष वायंगणकर यांच्यासह महेश सावंत, विनय सावंत, रमेश जामसंडेकर, संजय आंग्रे, दीपिका राबांडे यांचा समावेश आहे. तालुका पत्रकार समितीची बैठक तेलीआळी येथील भवानी हॉलमध्ये तालुकाध्यक्ष चंद्रशेखर देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी सचिव संजय राणे, खजिनदार नितीन कदम, जिल्हा उपाध्यक्ष रमेश जोगळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष राऊळ, उपाध्यक्ष उत्तम सावंत, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर तसेच तुषार सावंत, संजय पेटकर, वीरेंद्र चिंदकर, लक्ष्मीकांत भावे, रंजिता तहसीलदार, भगवान लोके, स्वप्नील वरवडेकर, विराज गोसावी, विनोद जाधव, महेश सावंत, रमाकांत बाणे, तुळशीदास कुडतरकर, अजित सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी तालुका पत्रकार समितीच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांबाबत चर्चा करण्यात आली. यात सर्व पुरस्कार एकमताने निश्चित करण्यात आले. तसेच जिल्हा पत्रकार संघाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तुषार सावंत यांच्या अभिनंदनाचा ठरावही घेण्यात आला. पुरस्कार वितरणाचे स्थळ व वेळ लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा