You are currently viewing सावंतवाडीत ५ जानेवारीला भव्य रोजगार मेळावा

सावंतवाडीत ५ जानेवारीला भव्य रोजगार मेळावा

ॲडमिशन, व्हॅरेनियम क्लाउड, सिक्योर क्रेडेंशियल्स कंपनीच्या माध्यमातून २२ प्रमुख कंपन्यांचे प्रतिनिधी दाखल

 

सावंतवाडी:

सावंतवाडीत ५ जानेवारीला जिमखाना मैदानावर संध्याकाळी ३ ते ६ या वेळेत भव्य रोजगार मेळावा घेण्यात येणारा आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या ॲडमिशन, व्हॅरेनियम क्लाउड आणि सिक्योर क्रेडेंशियल्स या कंपनीच्या माध्यमातून हा मेळावा होणार आहे. विशेष म्हणजे या मेळाव्यात सातशेहून अधिक मुलांच्या मुलाखती घेवून तात्काळ संबंधितांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.

या मेळाव्यासाठी ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, एचडीबी बँक, आदित्य बिर्ला, पेटीएम, विवो, जस्ट डायल, ग्लेनमार्क, गोयंम ऑटो, यशस्वी ग्रुप, मुथूट फायनान्स, व्ही ५ ग्लोबल सर्व्हिस, टाटा ट्रेंट, डीके असोसिएट्स, टेली परफॉर्मन्स, स्टे बर्ड हॉटेल आदी २२ प्रमुख कंपन्यांचे प्रतिनिधी दाखल होणार आहे. याबाबतची माहिती कंपनीच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

कोकणातील अनेक तरुण कोरोनाच्या काळात बेरोजगार झाले आहे. या तरुणांना नोकरी देण्यासाठी ॲडमिशन या संस्थेने पुढाकार घेतला आहे. भविष्यात सहा हजारहून अधिक युवकांना रोजगार देण्याचा कंपनीचा मानस आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा