सावंतवाडी शहरात पोलीस चौकी पुन्हा सुरू करा
अँड. संजू शिरोडकर यांचे सेवा अभियानात आमदार प्रमोद जठार व प्रदेशाध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकांकडे निवेदन
सावंतवाडी :
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये सेवा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानादरम्यान सावंतवाडी शहरातील नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने महत्त्वाची मागणी करण्यात आली.
सावंतवाडी शहरात पूर्वी कार्यरत असलेले पोलीस ठाणे काही वर्षांपूर्वी स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पोलीस सेवेसाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे लक्षात घेऊन शहरातील उभा बाजार, चितार आळी परिसरात सावंतवाडी शहर पोलीस चौकी पुन्हा सुरू करून ती कार्यरत करावी, अशी मागणी करण्यात आली.
यासंदर्भात भाजपचे माजी सावंतवाडी शहराध्यक्ष अँड. संजू शिरोडकर यांनी सेवा अभियानाचे संयोजक आमदार प्रमोदजी जठार तसेच प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक श्री. साखरे यांच्याकडे निवेदन सादर केले.
शहराच्या मध्यवर्ती भागात पोलीस चौकी पुन्हा सुरू झाल्यास नागरिकांना तातडीने पोलीस सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच बाजारपेठ परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासही याचा फायदा होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीषजी दळवी, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, सावंतवाडी उपनगराध्यक्ष अॅड. अनिलजी निरवडेकर, जिल्हा सरचिटणीस महेशजी सारंग, मंडल अध्यक्ष सुधीरजी आरिवडेकर, सौ. मोहिनी मडगावकर, मनोजजी नाईक, रवीजी मडगावकर, दिलीपजी भालेकर, आनंदजी नेवगी आदी उपस्थित होते.
