You are currently viewing करावी शब्दांची आराधना …..

करावी शब्दांची आराधना …..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या काव्यांजली काव्यप्रकार निर्मितीकारा लेखिका कवयित्री उज्वला कोल्हे लिखित अप्रतिम काव्यांजली काव्यरचना*

*करावी शब्दांची आराधना ……….*

शब्दचि देव
करावी शब्दांची आराधना
शारदेची उपासना
यथोचित

भाव गाभा-यातून
शब्दांची पूजा चाले
सावलीगत झाले
पाठिराखे

शब्दांच्या चक्रव्यूहात
जाण असावी सखोल
त्यांचे मोल
सांभाळावे

दुःखाच्या सागरात
शब्दच धीर देती
समजूत घालती
मनाची

राहून ऋणात
शब्दच माझा ध्यास
शब्दच श्वास
हृदयातले

जगण्याच्या प्रवासात
कविता मजला भेटली
फलद्रूप झाली
ओंजळ

(काव्यांजली निर्मितीकारा)

उज्ज्वला कोल्हे,(uk)
कोपरगाव

प्रतिक्रिया व्यक्त करा