जिल्हा क्रिडा अधिकारी विदया शिरस मॅडम यांनी केले कौतुक!
सावंतवाडी :
रत्नागिरी जिल्हा क्रिडा संकुल येथे झालेल्या शालेय विभागस्तरीय कॅरम स्पर्धेत सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीची कु.साक्षी रामदुरकर हीने सातत्यपूर्ण खेळ करत प्रथम क्रमांक पटकावला. अकरा वर्षीय साक्षीने कोल्हापुर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग मधील प्रतिस्पर्ध्यांवर मात करून चौदा वर्षांखालील गटात कोल्हापुर विभागात निर्विवाद वर्चस्व ठेवले.जिल्ह्यातील ज्येष्ठ कॅरम खेळाडू, प्रशिक्षक आणि मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षीने हे उल्लेखनीय यश मिळवले.
कु.साक्षी तालुक्यात, जिल्ह्यात आणि विभागीय कॅरम स्पर्धेत सातत्याने प्रथम क्रमांक मिळवणारी जिल्ह्यातील एकमेव खेळाडु ठरली आहे.
जिल्हा क्रिडा अधिकारी विदया शिरस मॅडम यांनी साक्षीचे विशेष कौतुक करुन तीला पुढे होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक कै.सुर्यकांत पेडणेकर यांचे सुपुत्र श्री.कौस्तुभ पेडणेकर यांच्या मुक्ताई ॲकेडमीला सांगली येथे ‘बेस्ट ॲकेडमी’ पुरस्कार मिळाल्याबददल श्री.कौस्तुभ पेडणेकर आणि विदयार्थ्यांचे कौतुक करतानाच ॲकेडमीने अनेक राष्ट्रीय खेळाडु तयार करावेत अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी विदया शिरस मॅडम यांनी ॲकेडमीचे राज्यस्तरीय कॅरम खेळाडु साक्षी रामदुरकर, क्षितिजा मुंबरकर, भावेश कुडतरकर, यशराज गवंडे, राष्ट्रीय बुदधिबळ खेळाडु विभव राऊळ, यश सावंत, भावेश कुडतरकर, प्रतिक देसाई, साक्षी रामदुरकर या खेळाडुंचे कौतुक करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.