वेंगुर्ले तालुक्यातील तुळस – बेहेरेवाडीमध्ये भाजपाच्या वतीने निर्जंतुकीकरण

वेंगुर्ले तालुक्यातील तुळस – बेहेरेवाडीमध्ये भाजपाच्या वतीने निर्जंतुकीकरण

वेंगुर्ले
वेंगुर्ले तालुक्यातील तुळस – बेहेरेवाडी येथील एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती कोरोना पाॅझेटीव्ह आढळून आल्याने तसेच याच कुटुंबातील एक व्रृद्ध व्यक्तीचे निधन झाल्याने संपुर्ण बेहेरेवाडी मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव संपुर्ण परीसरात होऊ नये म्हणून तातडीने भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई व तुळस सरपंच शंकर घारे यांनी पुढाकार घेऊन सावंतवाडीच्या संजु विरनोडकर टीमला पाचारण करून संपुर्ण बेहेरे वाडीतील आठ ते दहा घरे व आजुबाजूचा परीसर सॅनीटरायझर ची फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्यात आले.

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ढेपाळलेली आहे, मनुष्यबळ कमी पडत आहे त्यामुळेच सामाजिक बांधिलकी जपुन भाजपाच्या वतीने निर्जंतुकीकरण केले असल्याचे प्रसंन्ना ऊर्फ बाळु देसाई यांनी सांगितले.

यावेळी संजु विरनोडकर टीमचे सागर मळगांवकर, तुळस तलाठी ए.टी.गावडे, चंद्रकांत बेहेरे, रुपेश बेहेरे, आदित्य बेहेरे, विनायक बेहेरे, नितीन बेहरे इत्यादी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा