You are currently viewing मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मळगांव ब्राम्हणपाट रस्त्याची निवड; सरपंच व उपसरपंच यांच्या पाठपुराव्याला यश

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मळगांव ब्राम्हणपाट रस्त्याची निवड; सरपंच व उपसरपंच यांच्या पाठपुराव्याला यश

सावंतवाडी

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मळगांव गावातील ब्राम्हणपाट रस्त्याची निवड करण्यात आली आहे. यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मळगांव सरपंच स्नेहल जामदार व उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांनी या कामांसाठी पाठपुरावा केला होता त्याला यश आले असून दोन्ही रस्ते मंजूर झाले आहेत.

दरम्यान, सदरच्या रस्त्यांसाठी ८ ते ९ मीटर रूंदीच्या जागेची आवश्यकता भासणार आहे. याबाबत प्राधनमंत्री ग्रामसडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था उप अभियंता यांनी सरपंच स्नेहल जामदार यांना जमिन मालकांकडून जागा व ग्रामपंचायत ठराव उपलब्ध करून देण्यासाठीच पत्र दिले आहे.उपसरपंच हनुमंत पेडणेकर व सरपंच स्नेहल जामदार यांनी याबाबतचे मागणी पत्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिले होते. या मागणीला यश आले आहे. भविष्यातही केंद्रीय मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून उर्वरीत रस्त्यांची कामे पूर्ण केली जातील. तसेच अन्य नियोजित सर्व विकासकामे पूर्ण केली जातील, असा विश्वास उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा