You are currently viewing कासार्डे विद्यालयचे प्राचार्य एम.डी. खाड्ये ‘राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मानित

कासार्डे विद्यालयचे प्राचार्य एम.डी. खाड्ये ‘राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मानित

तळेरे:- प्रतिनिधी

कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे, ता.कणकवली याविद्यालयाचे प्राचार्य एम.डी. खाड्ये यांना हरमल गोवा येथे माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनुर यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले आहे.

इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी व नॅशनल रूलर डेव्हलपमेंट फाऊंडेशन बेळगावी यांच्यावतीने देण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय पुरस्कार वितरण प्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनुर, कोल्हापूर महानगरपालिकाचे महापौर राजू शिंगाडे, बेळगावचे माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंग पाटील, होमगार्ड डिपार्टमेंटचे जिल्हा कमांडर अरविंद घट्टी, गुजरातच्या कोमल शर्मा, दिल्लीचे विशेष अभियंता जयराज लोंढे, बिदरचे जिल्हा पोलीस अधिक्षक महेश मेघन्नावर आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

सन्मानपत्र, सन्मानचिन्ह तसेच कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांचे विशेष अभिनंदन पत्र आणि चंदनहार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्राचार्य एम.डी. खाड्ये यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल यापूर्वीही पाच ते सहा राज्य तसेच जिल्हास्तरीय विविध क्षेत्रातील पुरस्काराने ते सन्मानित झाले आहेत.

या प्राचार्य एम्.डी. खाड्ये यांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारबद्दल कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे सर्व पदाधिकारी, स्थानिक व्यवस्था समितीचे सर्व पदाधिकारी,शाळा समितीचे सर्व पदाधिकारी, तसेच विद्यालयचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या, त्यांचे सर्व स्तरातून विशेष अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा