सावंतवाडी
येथील रोटरी क्लब व दीपक केसरकर मित्र मंडळ यांच्या माध्यमातून सावंतवाडीत ३० डिसेंबर ते १ जानेवारी या काळात उडान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषद रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. या महोत्सवात फूड फेस्टिवल सह विविध मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे तर २५ हून अधिक फूड स्टॉल असणार आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.
रोटरीच्या माध्यमातून आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी रोटरीच्या अध्यक्षा विनया बाड, बाबू कुडतरकर, सुधीर नाईक, प्रसन्ना शिरोडकर,अनघा रामाने, पूर्वा निर्गुण, हर्षद चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रतिक बांदेकर, भावेश भिसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बाड म्हणाल्या, सावंतवाडीत दरवर्षी सावंतवाडी पर्यटन महोत्सव होतो. परंतु यावर्षी तो झालेला नाही. त्यामुळे इनरव्हील क्लबच्या माध्यमातून घेण्यात आलेला महोत्सव यशस्वी झाल्यानंतर रोटरीच्या माध्यमातून पुन्हा एकदा महोत्सव घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. याचा फायदा सावंतवाडी शहरातील लोकांना होणार आहे. या ठिकाणी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्याबरोबर फुड स्टॉल उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे विविध पदार्थांची मजा लोकांना चाकता येणार आहे. 30 तारखेला या महोत्सवाचे माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी इचलकरंजी येथील कार्यक्रम तर अन्य दोन दिवस मनोरंजनाचे कार्यक्रम, स्टेटस स्पर्धा आदी उपक्रम घेण्यात येणार आहेत.