You are currently viewing झोळंबेत तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू

झोळंबेत तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू

दोडामार्ग

विहिरीत पडून ३६ वर्षीय तरुणाचे निधन झाल्याची धक्कादायक घटना रविवारी झोळंबे- गावठाणवाडी येथे घडली. मयत सुशांत रामा मयेकर हा आपल्या नारळ, सुपारीच्या बागेला पाणी लावण्यासाठी गेले असता काळाने त्याच्यावर घाला घातला. याबाबत पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आल्याची देण्यात आली.

झोळंबे-गावठाणवाडी येथील मयत सुशांत रामा मयेकर हा रविवारी सकाळी आठ वाजता घरातून बाहेर पडला. दुपारचे दोन वाजले तरी घरी आला नसल्याने त्याची आई शोधासाठी घराबाहेर पडली. इतरत्र शोधाशोध करून देखील आढळला नाही. गावाशेजारी त्यांची नारळ-सुपारीची बाग आहे. त्या बागेला पाणी देण्यासाठी जात असतो. त्यामुळे त्याची आई व गावातील युवक बागेच्या ठिकाणी गेले. बागेत कठडा नसलेली एक विहीर आहे. विहिरीच्या ठिकाणी पाण्याचे कॅन दिसले. त्यामुळे ग्रामस्थांना संशय आला. ग्रामस्थांनी मोटारीच्या साहाय्याने विहिरीतील. पाणी काढले. त्यावेळी सुशांत याचा मृतदेह पाण्यात दिसला. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. मृतदेह विच्छेदनासाठी तळकट आरोग्य केंद्रात नेण्यात आला. पाण्यात बुडूनच मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात निष्पन्न झाले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, चार वर्षाची मुलगी, दोन वर्षांचा मुलगा व भाऊ असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा