भारत पेट्रोलियममध्ये इंजिनीअर आणि डिप्लोमा धारकांसाठी नोकरीची संधी; लगेच करा अप्लाय

भारत पेट्रोलियममध्ये इंजिनीअर आणि डिप्लोमा धारकांसाठी नोकरीची संधी; लगेच करा अप्लाय

 

भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (Bharat Petroleum Corporation Ltd) या कंपनीत इंजिनिअरिंग डिप्लोमा (Engineering Diploma) आणि पदवीधारकांसाठी (Engineering Degree) लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इंजिनिअरिंग डिप्लोमा अप्रेन्टिस (Apprentice) आणि डिग्री अप्रेन्टिस पदासाठी ही पदभरती होणार आहे. या पदभरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

पदवीधर अप्रेंटिस (Graduate Apprentice) – एकूण जागा 120

टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस (Diploma Apprentice) – एकूण जागा 48

शैक्षणिक पात्रता

पदवीधर अप्रेंटिस – 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.

टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

या पदावर अर्ज करण्यासाठी  18 ते 27 वर्ष वयोमर्यादा आहे. तसंच मागासवर्गीयांना 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  20 जुलै 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी *इथे क्लिक करा*

https://drive.google.com/file/d/1l46rv6WZSoDNbSENzc1r3CqHWX-gwPPQ/view?usp=drivesdk

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी *इथे क्लिक करा*

http://portal.mhrdnats.gov.in/

प्रतिक्रिया व्यक्त करा