You are currently viewing साळगाव विद्यालयाचे २९ डिसेंबर रोजी वार्षिक पारितोषिक वितरण

साळगाव विद्यालयाचे २९ डिसेंबर रोजी वार्षिक पारितोषिक वितरण

मान्यवरांची उपस्थिती व करिअर मार्गदर्शन

कुडाळ :

तालुक्यातील साळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी साळगाव संचालित, शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साळगाव या प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार दिनांक २९ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता तर स्नेहसंमेलन ३० डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख, मराठी अध्यापक संघाचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष भरत गावडे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व माजी विद्यार्थी सद्गुरु डिचोलकर, युवा उद्योजक तुषार माईनकर, हॉटेल कारगिलचे मालक विनोद खानोलकर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन पार पडणार आहे.
तरी साळगाव पंचक्रोशीतील शिक्षण प्रेमी, आजी माजी विद्यार्थी व पालकांना उपस्थितीचे आवाहन संस्था अध्यक्ष प्रदीप प्रभूतेंडोलकर संस्था सचिव मुकुंद धुरी, विद्यालयाचे मुख्याध्यापक सलीम तकीलदार, शालेय मुख्यमंत्री स्वानंदी सामंत, सांस्कृतिक मंत्री सानिका डिचोलकर आदींनी केले आहे.
याप्रसंगी सर्व संस्था पदाधिकारी, संस्था संचालक, विद्यालयातील कर्मचारी वृंद, प्रशालेचे आजी-माजी विद्यार्थी, शिक्षण प्रेमी व साळगाव ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत, असे मुख्याध्यापक सलीम तकीलदार यांनी कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा