You are currently viewing असामान्य स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक,साने गुरुजी…
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

असामान्य स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक,साने गुरुजी…

*वक्रतुण्ड साहित्य समूहाचे संस्थापक लेखक कवी श्री जगन्नाथ खराटे लिखित अप्रतिम लेख*

*असामान्य स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक,साने गुरुजी…*

“आता उठवू सारे रान,आता पेटवू सारे रान,, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी,लावुन पणाला प्राण……

स्वातंत्र्यलढ्यातील, समाजप्रबोधनाचे रणशिंग फुंकनारे ह्या स्वातंत्र्यगीतातुन साने गुरुजीनी देशभक्तीच्या धगधगत्या ज्वालेची, तेजस्वी मशाल पेटवली अन् निद्रिस्त जनता जागृत झाली..
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता लढणार्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांमध्यै ,अगदी शांतपणे अन्, सौजन्यशिलतेने स्वातंत्र्यासाठी लढनारे, शांतताप्रिय, गुणीजन व्यक्तीमत्व म्हणजे पांडुरंग नारायण साने किंबहुना सानेगुरुजी..


रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पालगड सारख्या दुर्गम भागातील गावी २४डिसेंबर१८९९ साली सौजन्य मुर्ती, सानेगुरुजीचा जन्म झाला. इथे “जगाला प्रेम अर्पावे” हे संदेश‌ देवुन,देशभरातील लोकांना सर्वच भाषा समजाव्यात.. त्यांचे एकमेकांशी हृदयस्थ नाते जोडले जावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या.. “बलसागर भारतासाठी” भूमिका मांडणाऱ्या पांडुरंग सदाशिव पाटील साने ह्यांचे प्राथमिक शिक्षणही पालगडलांच झाले .
अत्यंत सौजन्याने वागणारे एक मातृह्रदयी शिक्षक म्हणून लोक साने गुरुजी म्हणू लागले ..जगाला त्यांची ओळखु लागले ..अत्यंत कोमलहृदयी.. संवेदनशील.. निष्ठावंत व्यक्तीमत्वाचं मातृभूमिवरचं निस्सीम प्रेम अन अत्यंत सुलभ भाषा ,समाजाविषयी कळवळा, स्नेह.प्रेम हे सारं त्यांच्या शब्दाशब्दातुन प्रकट होई.आईच्याअप्रतिम संस्कारानी घडले असल्याने,तिच्यावरचे लिहलेले ‘श्यामची आई’ हे बालसंस्कारी हे त्यांचं लोकप्रिय असं पुस्तक लिहुन आईबद्दलच्या प्रेमाचं प्रतीक ठरलं..


सानेगुरुजींनी १९२४ साली अंमळनेर ‌मधील शिक्षक आणि वसतीगृह प्रमुखाची नोकरी सोडून स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय झाले. सविनय कायदेभंग चळवळीत जनजागृती केल्यामुळे त्यांनी तुरुंगवास पत्करला.. गांधीवाद व समाजवादी असे गरुजी जातीयवाद.,अस्पृश्यता,अनिष्ट प्रथेविरुद्ध लढुन ते धुळ्यातल्या कारावासात, त्यांनी विनोबाजींची गीताप्रवचने आणि इतरही. संस्कारी.. वैचारिक. प्रेरणादायी असे विपुल‌ साहित्यलिखान‌ केले.स्वातंत्र्यकाळांत राष्ट्रसेवादलाचे व साधना मासिकाचे संपादक ह्या नात्याने त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले..
विविध अशा साहित्यकृतीतील बालसाहित्यिक,कथा,कविता,निबंध.. चरित्रलेखन,अनुवाद असा विविधांगी ७३ पुस्तकांचे लेखन करुन तसेच नामवंत व्यक्तींचे चरित्र,करुन लेखनासोबत, भारतीय संस्कृतीवरचा “भारतीय संस्कृती’ हा ग्रंथाचे लेखन केले…
देशभक्तिपर कवितांसाठी “पत्री” ह्या काव्यसंग्रहातील “बलसागर भारत होवो”ह्या सारख्या कवितांच्या नागरिकांवरील वाढता प्रभावामुळे ल ब्रिटिशांनी काव्यसंग्रहाच्या प्रतींवर बंदी घातली..


देशातील प्रत्येक,प्रांताप्रांतातील कलहंच होवु नये,व एकात्मता बळकट होण्यास मदतीसाठी ते स्वतः तामीळ.. मल्याळम,इ भाषा आत्मसात करून त्यांनी ‘आंतरभारती संस्थेची’ स्थापन केली.आजही लोक अनेक परदेशी भाषा शिकतात पण दुर्दैवाने देशातील लोक हे अन्य प्रांतातील भाषा शिकत नाहीत हे कटु सत्य आहे..

अनेक लोकोपयोगी उपक्रमासोबत, भाषांभाषांतील साहित्य अनुवादाचे महत्वाचे काम करणारी त्यांची संस्था, सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारक संस्था ही रायगड जिल्ह्यात मानगड येथे अजुन ही कार्यरत आहेत.
*स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ते लढलेच. जातीभेद विरहीत.प्रांतीयभेद विरहीत.. सुशिक्षित आदर्श समाज निर्माणासाठी त्यांचे जीवनकार्य.व लिखाण कार्य हे आजही दिपस्तंभासारखे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरते.अश्या या थोर स्वातंत्र्य सैनिक देशप्रेमी साहित्यिकास विनम्र अभिवादन…

©️जगन्नाथ खराटे-ठाणे
२४डिसे२०२२

प्रतिक्रिया व्यक्त करा