कणकवली
महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि सिंधुदुर्गाचे सुपुत्र व माजी पालकमंत्री सन्माननीय श्री उदय रावजी सामंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प .पू भालचंद्र महाराज मठामध्ये व श्री देव काशी विश्वेश्वर यांच्या चरणी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून उदय सामंत यांना निरोगी व दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी प्रार्थना केली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बाळासाहेब ठाकरे सेना गटाचे नेते सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख महेंद्र सावंत, महेश तेली, निलेश तेली ,प्रदीप तळगावकर , उद्योजक दयानंद बांदेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.