You are currently viewing ना. उदय  सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब ठाकरे गटाकडून दीर्घ आयुष्यासाठी  प्रार्थना

ना. उदय  सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब ठाकरे गटाकडून दीर्घ आयुष्यासाठी  प्रार्थना

कणकवली

महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि सिंधुदुर्गाचे सुपुत्र व माजी पालकमंत्री सन्माननीय श्री उदय रावजी सामंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प .पू भालचंद्र महाराज मठामध्ये व श्री देव काशी विश्वेश्वर यांच्या चरणी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून उदय सामंत यांना निरोगी व दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी प्रार्थना केली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बाळासाहेब ठाकरे सेना गटाचे नेते सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख महेंद्र सावंत, महेश तेली, निलेश तेली ,प्रदीप तळगावकर , उद्योजक दयानंद बांदेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + one =