You are currently viewing विद्यार्थी दशेतच स्पर्धा परीक्षांचा पाया मजबूत करा – निरंजन दिक्षित

विद्यार्थी दशेतच स्पर्धा परीक्षांचा पाया मजबूत करा – निरंजन दिक्षित

देवगड

विद्यार्थी दशेतच स्पर्धा परीक्षांना सामोरे जाऊन अधिकारी होण्याचा पाया मजबूत करा असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत निरंजन दीक्षित यांनी केले. जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या प्रसंगी विचार मंचावर कार्यक्रमाध्यक्ष प्रसाद मोंडकर, प्रवीण जोग, अभिषेक गोगटे, वालकर, सौ. गोगटे, संतोष किंजवडेकर, शिक्षक व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पुजनाने करण्यात आली. प्राथमिक ते उच्च माध्यमिक विभागाच्या विविध स्पर्धातील यशवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारतानाच निरंजन दीक्षित यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत करून यशवंत व्हा असे सांगितले. अभिषेक गोगटे यांनीही विद्यार्थ्यांना समयोजित मार्गदर्शन केले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रसाद मोंडकर यांनी यशस्वी जीवनाचा मूलमंत्र कथन करून विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले . कार्यक्रमाचे स्वागत व परिचय ज्येष्ठ शिक्षक विनायक ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका दीपा मराठे यांनी केले. बक्षीस वितरणाचे वाचन संदीप शिंगे व विनायक जाधव खाजनवाडकर यांनी केले. सूत्रसंचालन संजय गोगटे व आभार प्रदर्शन सुनील जाधव यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 1 =