You are currently viewing तेरेखोल नदीपात्रातील एक लाख चाळीस हजार ब्रास गाळ काढणार

तेरेखोल नदीपात्रातील एक लाख चाळीस हजार ब्रास गाळ काढणार

खासदार विनायक राऊत : विलवडे ते बांद्यापर्यंत नियोजन; उद्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक

बांदा

पावसाळ्यात उद्भवणारी पुरस्थिती टाळण्यासाठी तेरेखोल नदीपात्रात विलवडे पासून बांद्यापर्यंत सुमारे १ लाख ४० हजार ब्रास गाळ काढण्याचे आमचे नियोजन आहे. हे काम खर्चिक असल्याने शासन व खासगी संस्थांच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे.

यासंदर्भात उद्या मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्यासोबत आयोजित बैठकीत प्रशासनाला काम करण्यासंदर्भात सूचना देण्यात येणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी येथे दिली. खासदार राऊत यांनी आज दुपारी तेरेखोल नदीपात्राची शिवसेना पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्त्यांसह पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार राजाराम म्हात्रे, तलाठी वर्षा नाडकर्णी, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, अशोक दळवी, ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर, राजेश विरनोडकर, सुशांत पांगम, संदेश पावसकर, भैय्या गोवेकर, भाऊ वाळके, पांडुरंग नाटेकर, प्रशांत पांगम, ज्ञानेश्वर येडवे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा