You are currently viewing नांदगाव वैश्य समाजाचा 31 रोजी स्नेहमेळावा व सरपंच, सदस्यांचा गौरव

नांदगाव वैश्य समाजाचा 31 रोजी स्नेहमेळावा व सरपंच, सदस्यांचा गौरव

कणकवली

कणकवली तालुक्यातील नांदगाव वैश्य समाज नांदगाव यांच्या वतीने सह कुटुंब स्नेह मेळावा व नांदगाव ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा गौरव सोहळा शनिवार 31 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता रवळनाथ मंदिर नांदगाव येथे आयोजित करण्यात आला आहे .

याबाबत नुकतीच श्रीराम मंदिर नांदगाव मोरयेवाडी येथे वैश्य समाज बांधवांची बैठक संपन्न झाली.यावेळी नागेश मोरये, पंढरीनाथ पारकर,विजय म्हाडेश्वर, दिलिप फोंडके, ऋषिकेश मोरजकर, मारुती मोरये, मंगेश बोभाटे, हरिश्चंद्र बिडये,विठोबा कांदळकर, शामसुंदर मोरये,दशरथ मोरये,शंकर मोरये आदी समाज बांधव उपस्थित होते.
या बैठकीत वरील प्रमाणे स्नेहमेळावा व स्नेह भोजन आणि नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा गौरव सोहळा ठरविण्यात आला आहे.
या मेळाव्यात जिल्हा व तालुका वैश्य समाजाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत . तरी समाजातील सहकुटुंब सहपरिवार यांनी अवश्य उपस्थित राहावे. असे आवाहन नांदगाव वैश्य समाज नांदगाव तर्फे करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा