You are currently viewing श्री संत सेना महाराज सांप्रदायिक भजन मंडळांची १८ वी वार्षिक तिर्थयात्रा!

श्री संत सेना महाराज सांप्रदायिक भजन मंडळांची १८ वी वार्षिक तिर्थयात्रा!

मुंबई

श्री संत सेना महाराज सांप्रदायिक भजन मंडळ भांडुप मुंबई प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र पंढरपूर तीर्थयात्राचे रविवार दि.२५ ते ३१ डिसेंबर आयोजन करण्यात आले आहे.यात्रेची १९ ठिकाणे असून प्रत्येक वस्तीवर सुस्वर भजन होणार आहे तसेच पंढरपूर येथे महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ घेण्यात येईल. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी यांचे दर्शन घेऊन चंद्रभागेत स्थान करून पांडुरंगाच्या भगव्या पताका निशाण पूजन होऊन पुंडलिकाचे दर्शन घेत दिंडी मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण पांडुरंगाचे दर्शन होईल असे मंडळाचे प्रेरणास्थान अनिल केशव कदम यांनी सूचित करुन हा वैष्णवांचा मेळा भरतो. त्यात तल्लीन होऊन देह भान हरपून नाचतो, गातो आणि वर्षेभर पुरेल अशी उर्जा साठवून ठेवत असतो. सदर ही १८ वी वार्षिक तिर्थयात्रा आहे. समानता, बुधभाव, एकोपा खऱ्याअर्थाने जोपासला जातो. म्हणून प्रतिवर्षी नचुकता भेटूया पुढील वर्षी नाम घेऊ विठ्ठलाचे असे म्हणत एकमेकांचा निरोप घेतला जातो.

प्रतिक्रिया व्यक्त करा