You are currently viewing हिर्लोक येथे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भात खरेदी केंद्राचा शुभारंभ

हिर्लोक येथे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भात खरेदी केंद्राचा शुभारंभ

कुडाळ

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ यांच्या वतीने बजाज सिंधुदुर्ग राईस मिल अंतर्गत कुडाळ तालुक्यातील हिर्लोक येथे भात खरेदी केंद्राचा शुभारंभ कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत फित कापून करण्यात आला.


भात खरेदीसाठी गतवर्षी शेतकऱ्यांना क्विंटलमागे १८१५ रु हमीभाव देण्यात आला होता. तसेच त्यावर ७०० रु बोनस मिळून २५१५ रु दर देण्यात आला होता. यावर्षी शासनाने हमीभावात ५३ रु रुपयांची वाढ केली असून १८६८ रु हमीभाव देण्यात येणार आहे. तसेच बोनस स्वरूपात ७०० रु. देण्यात येणार असून एकूण २५६८ रु दर शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शासकीय भात खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा. असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी यावेळी केले.
याप्रसंगी जि.प. गटनेते नागेंद्र परब, हिर्लोक सरपंच कन्याश्री मेस्त्री, उपसरपंच नरेंद्र राणे, कुडाळ तालुका कृषी अधिकारी रमाकांत कांबळी, बजाज राईस मिलचे संदीप चव्हाण, विनोद सावंत, बाजीराव झेंडे, शाम सावंत, सचिन चोरगे, संतोष गावडे, ग्रामपंचायत सदस्य सोनाली सावंत, अस्मिता सावंत, अनुराधा सावंत, हिर्लोक शाखा प्रमुख चंद्रकांत सावंत, संदीप ढावले, शरद धुरी, वैभवी सावंत आदीसह प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − eleven =