You are currently viewing मालवण तालुक्यातील शिवसेनेच्या नवनिर्वाचित सरपंच व ग्रा. पं. सदस्यांचा उद्या आ.वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

मालवण तालुक्यातील शिवसेनेच्या नवनिर्वाचित सरपंच व ग्रा. पं. सदस्यांचा उद्या आ.वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

*नवनिर्वाचित सर्व सरपंच व ग्रा.पं.सदस्य यांनी उपस्थित राहण्याचे हरी खोबरेकर, मंदार केणी यांचे आवाहन*

 

मालवण :

मालवण तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ उद्या रविवार दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११.००. वाजता आर. जे. चव्हाण हॉल मालवण (वायरी तानाजी नाका शेजारी) येथे होणार आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

यावेळी शिवसेना युवानेते संदेश पारकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, कुडाळ मालवण विधानसभा संपर्क प्रमुख संग्राम प्रभुगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार समारंभ होणार आहे. तरी मालवण तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित सर्व सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा