खंडाळ्याजवळ बस उलटून मोठा अपघात….

खंडाळ्याजवळ बस उलटून मोठा अपघात….

2 जण जागीच ठार झाले तर 17 प्रवासी जखमी

पुणे 
पुण्याहून यवतमाळसाठी निघालेल्या खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. आजचा तीन खासगी बसचे तीन भीषण अपघात झाले. उत्तराखंड, नंदुरबारहून सूरतला निघालेल्या खासगी बसला आणि त्यानंतर पुण्याहून यवतमाळला निघालेल्या बसला भीषण अपघात झाला आहे. खंडाळा घाटामध्ये बस उलटी झाल्यानं मोठा अपघात झाला. या अपघातात 2 जण जागीच ठार झाले तर 17 प्रवासी जखमी झाले.

पुण्याहून यवतमाळसाठी निघालेल्या खासगी बसला भीषण अपघात झाला. यामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. खंडाळा घाटात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

बुधवारी पहाटे देखील असाच जळगावहून सूरतला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात झाला होता.

जळगाव-सूरत राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली खासगी बस दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली. कोंडाईबारी घाटातील दर्ग्याजवळ पुलावरून जात असताना 30 ते 40 फूट खोल दरीत ही खासगी बस कोसळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 35 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या 35 प्रवाशांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

दुसरीकडे उत्तराखंडमधील बाजपूर इथे बस उलटून मोठी दुर्घटना घडली. रविवारी पाहाटे 3 वाजता हा अपघात घडला आहे. या भयंकर अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बस चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा