You are currently viewing मसूरे येथे उद्योजिका सुषमा सावंत यांचा सत्कार..

मसूरे येथे उद्योजिका सुषमा सावंत यांचा सत्कार..

मालवण / मसुरे :

मसुरे केंद्र शाळा आज सर्व शेत्रात प्रगती करत आहे हे पाहून प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी म्हणून आम्हाला गौरवाचे आहे. या प्रशालेने आम्हाला घडविल्यामुळे आज आम्ही सर्व मुले चांगली घडलो. यापुढे या प्रशालेच्या उन्नतीसाठी आम्ही सदैव तयार आहोत असे प्रतिपादन मसुरे केंद्र शाळेच्या माजी विद्यार्थीनी तथा मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजिका सुषमा सावंत यांनी मसुरे येथे सत्कारास उत्तर देताना केले.

मसुरे केंद्र शाळेच्या माजी विद्यार्थीनी उदोजिका सौ. सुषमा सावंत यांनी मसुरे केंद्र शाळेला सदिच्छा भेट दिली. या वेळी मसुरे केंद्र शाळेच्या वतीने सुषमा सावंत यांचा या प्रशालेच्या मुख्याध्यापिका शर्वरी सावंत यांच्या हस्ते हृदय सत्कार करण्यात आला. यावेळी सुषमा सावंत यांनी शाळेत राबविल्या जाणा-या सर्व उपक्रमांची माहिती घेतली. तसेच शाळेच्या प्रगतीविषयी कौतुक केले. तसेच शालेय उपक्रमांसाठी शैक्षणिक उठाव म्हणून रोख ५१०१/- आर्थिक देणगी दिली.

यावेळी मुख्याध्यापिका सौ. शर्वरी सावंत, सौ. लक्ष्मी पेडणेकर, गुरुनाथ ताम्हणकर श्रीमती मगर मॅडम, श्री गावडे सर, भूषण सावंत आणि शिक्षकवर्ग, ग्रामस्थ, पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन गुरुनाथ ताम्हणकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − one =