You are currently viewing विद्योदय मुक्तांगण परिवार फौंडेशनला सेवा गौरव पुरस्कार जाहीर

विद्योदय मुक्तांगण परिवार फौंडेशनला सेवा गौरव पुरस्कार जाहीर

विद्योदय मुक्तांगण परिवार फौंडेशनला सेवा गौरव पुरस्कार जाहीर

इचलकरंजी : प्रतिनिधी

शिरदवाड (ता. शिरोळ ) येथील विद्योदय मुक्तांगण परिवार फौंडेशनला शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुण्याच्या
शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरिअल ट्रस्टच्यावतीने सेवा गौरव पुरस्कार जाहीर केला आहे.

विद्योदय मुक्तांगण परिवार फौंडेशनच्या माध्यमातून विनायक माळी ,सौ.सार्शा माळी व त्यांचे सहकारी ग्रामीण परिसरातील वंचित , उपेक्षित वर्गातील मुलांच्या शिक्षणासाठी अत्यंत तळमळीने काम करतात .तसेच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात.या कार्याची दखल घेऊनच नुकताच
पुण्याच्या शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरिअल ट्रस्टच्यावतीने यंदाच्या वर्षी
विद्योदय मुक्तांगण परिवार फौंडेशन परिवारला सेवा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रोख
५० हजार रुपये , मानपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या पुरस्काराचे वितरण
रविवार दि. २३ जुलै रोजी दादासाहेब केतकर सभागृह
पुणे येथे प्रमुख अतिथी
गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे कुलगुरू डॉ.अजित रानडे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.या पुरस्काराबद्दल विद्योदय मुक्तांगण परिवार फौंडेशन परिवारचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा